टोमॅटो हा असा एक पदार्थ आहे जो रोजच्या स्वयंपाकात हमखास वापरला जातो. अनेक पदार्थांमध्ये टोमॅटोशिवाय चव येत नाही. टोमॅटोला आहारात विविध प्रकारे समाविष्ट करता येते. पण जर तुम्ही सलग 1 महिना टोमॅटोचा रस प्यायला तर तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतील, याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे. टोमेटोचा सर पिणे आरोग्यासाठी किती चांगले आहे हे यातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टोमॅटोचा रस पिण्याचे प्रमुख फायदे
- किडनी आणि मूत्रसंस्था: टोमॅटोचा रस मूत्रसंबंधी (युरिन) समस्या कमी करण्यास मदत करतो. तसेच, तो किडनी स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतो.
- हाडे मजबूत: रोज टोमॅटोचा रस पिल्याने हाडे कमकुवत होण्यापासून वाचू शकतात. हाडांच्या कमजोरीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा ज्यूस फायदेशीर आहे.
- उत्तम पचन: पचनसंस्था (Digestion) चांगली ठेवण्यासाठी टोमॅटोच्या रसाचे नियमित सेवन उपयुक्त ठरू शकते.
- वजन नियंत्रण: जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर 1 महिन्यापर्यंत रोज टोमॅटोचा रस पिणे नक्कीच मदत करू शकते.
- त्वचेचे आरोग्य: टोमॅटोच्या रसाच्या सेवनाने त्वचेचे आरोग्य (Skin Health) सुधारण्यास मदत मिळते. कारण त्यात अनेक उपयुक्त घटक असतात.
- हृदयासाठी लाभ: टोमॅटोमध्ये असे गुणधर्म आढळतात जे हृदयाला (Heart) निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतात.
टोमॅटोचा रस कसा तयार करावा हे ही आपण जाणून घेणार आहोत. टोमॅटोचा रस बनवण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुऊन लहान तुकड्यांमध्ये कापा. हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून रस काढा. चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड , आले पेस्ट आणि लिंबाचा रस मिसळून लगेच पिऊन घ्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world