Makhana Benefits: जर तुम्ही हेल्दी स्नॅक्सच्या शोधात असाल तर तुपात भाजलेले मखाणे तुमच्या आहाराचा भाग बनू शकतात. आयुर्वेदाचार्य डॉ. राम अवतार यांच्या मते, एक महिना नियमितपणे याचे सेवन केल्यास वजन, पचन, ब्लड शुगर आणि हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. मखाण्याची चव सर्वांनीच नक्कीच चाखली असेल, पण तुम्ही कधी भाजलेल्या मखाण्यांची चव घेतली आहे का? मखाणे केवळ चवीलाच अप्रतिम नाहीत, तर आरोग्यासाठीही उत्तम आहेत. अनेक लोकांसोबत असे घडते की जेव्हा ते काही तरी हेल्दी खाण्याचा विचार करतात, तेव्हा काय खावे हे ठरवू शकत नाहीत. अशा वेळी भाजलेले मखाणे तुमचा 'गो-टू स्नॅक' बनू शकतात. मखाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण जर तुम्ही 1 महिना सलग तुपात भाजून खाल्ले तर शरीराला दुप्पट फायदे मिळू शकतात.
याच विषयावर एनडीटीव्हीने (NDTV) आयुर्वेदाचार्य आणि योगगुरू डॉ. राम अवतार (Prof. Dr. Ram Avtar) यांच्याशी संवाद साधला. डॉ. अवतार यांना योग, आयुर्वेद, नाडी विज्ञान आणि न्युरोथेरपीचा 38 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. भाजलेले मखाणे खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले.
तुपात भाजलेले मखाणे खाण्याचे फायदे: एक महिन्यापर्यंत तुपात भाजलेले मखाणे खाल्ल्याने काय होऊ शकते?
तुपात भाजलेले मखाणे वजन कमी करण्यास कशी मदत करतात?
डॉ. राम अवतार सांगतात की, तुपात भाजलेल्या मखाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचे चांगले प्रमाण आढळते, जे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवून तुम्हाला ओव्हरईटिंग करण्यापासून रोखते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
डॉक्टरांच्या मते, काही लोकांना बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जातात. मखाण्यांमध्ये आढळणारे फायबर पचनसंस्था मजबूत करून बद्धकोष्ठता, गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवून देऊ शकते.
हॉर्मोनल संतुलन राखण्यास मदत
अँटी-ऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिडचा उत्तम साठा असलेले मखाणे शरीरातील हॉर्मोनल संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ज्या महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही किंवा ज्या मेनोपॉजच्या (रजोनिवृत्ती) टप्प्यातून जात आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगला स्नॅक आहे.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवू शकतात
जे लोक मधुमेहाच्या (डायबिटीज) समस्येने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी मखाणे एक उत्तम आणि निरोगी स्नॅक ठरू शकतो. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
(नक्की वाचा: Sleep System: रात्र झाली की लगेच झोप का येते? त्यामागे मेंदूत घडणारं 'हे' मोठं रहस्य जाणून घ्या)
हृदय राहील निरोगी
मखाण्यामध्ये पोटॅशियम आणि तुपात 'गुड कोलेस्ट्रॉल' आढळते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा (बीपी) त्रास आहे, त्यांनी याचे सेवन करायला हवे.
हाडे बनवतो मजबूत
मखाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारख्या खनिजांचा उत्तम साठा असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही कमकुवत हाडांच्या समस्येने त्रस्त असाल, तर याचे नियमित सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
मखान्यामध्ये कोणकोणती पोषक तत्त्वे आढळतात? Makhana Nutritional Value
- मखाण्यामध्ये किती कॅलरीज असतात: सुमारे 347
- मखाण्यामध्ये किती कार्बोहायड्रेट्स असतात: 76.9 ग्रॅम
- मखाण्यामध्ये किती फायबर असते: सुमारे 14.5 ग्रॅम
- मखाण्यामध्ये किती फॅट्स असते: सुमारे 0.1 ते 0.5 ग्रॅम
- मखाण्यामध्ये किती कॅल्शियम असते: सुमारे 60 मि.ग्रॅ.
100 ग्रॅम मखाण्यामध्ये किती प्रोटीन असते?
डॉ. राम अवतार सांगतात की, जर तुम्ही 100 ग्रॅम मखाणे खात असाल, तर तुम्हाला सुमारे 9.7 ग्रॅम ते 10.5 ग्रॅम प्रोटीन मिळू शकते. तर दुसरीकडे जर तुम्ही वाटीभर म्हणजेच 30 ग्रॅम मखाणे खाल्ले, तर तुमच्या शरीराला 3 ग्रॅम प्रोटीन मिळू शकते.
एका दिवसात किती मखाणे खाल्ले पाहिजे?
आता जर तुम्हाला वाटत असेल की मखाणा तुमच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी चांगला आहे आणि तुम्हाला मखाण्यांचा डाएटमध्ये समावेश करायचा असेल तर सर्वात पहिला प्रश्न असा पडतो की एका दिवसात किती मखाणे खाल्ले पाहिजेत? याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. राम अवतार सांगतात की, एका निरोगी व्यक्तीने एका दिवसात मूठभर म्हणजेच 30 ते 40 ग्रॅम मखाणे खाल्ले पाहिजे.
मखाणे खाण्याची उत्तम पद्धत कोणती?
घरी तुपात भाजलेले मखाणे बनवण्यासाठी
1. एका पॅनमध्ये थोडे तूप घाला.
2. आता त्यात एक वाटी मखाणे टाका.
3. तुम्हाला हवे असल्यास थोडे मीठ टाकू शकता.
4. हलके भाजून घ्या आणि मग संध्याकाळचा स्नॅक म्हणून याचा आस्वाद घ्या.
कोणत्या लोकांनी मखाणे खाणे टाळले पाहिजे?
- किडनी स्टोनची समस्या
- आयबीएस (IBS) च्या समस्येने त्रस्त असलेले रुग्ण
- ॲलर्जी
- युरिक ॲसिडची समस्या
मखाणे खाण्याबाबत सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. रोज मखाणे खाणे योग्य आहे का?
उत्तर: होय, मर्यादित प्रमाणात रोज मखाणे खाणे फायदेशीर ठरू शकते.
2. एका दिवसात किती मखाणे खाल्ले पाहिजेत?
उत्तर: सुमारे 30-40 ग्रॅम किंवा मूठभर मखाणे पुरेसे मानले जातात.
3. मखाणा वजन कमी करण्यास मदत करतो का?
उत्तर: मखाण्यामध्ये फायबर आणि प्रोटीन असते, जे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करू शकते.
4. मधुमेही (डायबिटीज) रुग्ण मखाणे खाऊ शकतात का?
उत्तर: कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे मर्यादित प्रमाणात मखाणा खाणे हा एक चांगला स्नॅकचा पर्याय ठरू शकतो.
5. कोणी मखाणे खाऊ नयेत?
उत्तर: किडनी स्टोन, आयबीएस (IBS), हाय युरिक ॲसिड आणि मखाण्याची ॲलर्जी असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन केले पाहिजे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)