जाहिरात

Sleep System: रात्र झाली की लगेच झोप का येते? त्यामागे मेंदूत घडणारं 'हे' मोठं रहस्य जाणून घ्या

Sleep System: रात्री आपल्याला झोप नेमकी कशी येते? मेंदूतील 'स्लीप सिस्टम', मेलॅटोनीन हार्मोन आणि शांत झोपेसाठी डॉक्टरांनी दिलेल्या सोप्या टिप्सबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Sleep System: रात्र झाली की लगेच झोप का येते? त्यामागे मेंदूत घडणारं 'हे' मोठं रहस्य जाणून घ्या
"Sleep System: झोप नेमकी कशी येते?"
Canva

- डॉ. रुचा पै
Sleep System:
रात्र झाली की आपल्याला आपोआप झोप येऊ लागते, पण ही झोप नेमकी कशी येते याचा कधी विचार केला आहे का? आपल्याला झोप येणे हे केवळ दिवसभराच्या शारीरिक थकव्यामुळे होत नाही, तर त्यामागे आपल्या मेंदूतील 'स्लीप सिस्टम' कार्यरत असते. याबाबत डॉ. रुचा पै यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया... 

झोप येते तरी कशी? तुम्हाला माहिती आहे का? रात्री आपल्याला झोप येते ती फक्त थकव्यामुळे नाही तर आपल्या मेंदूमध्ये एक संपूर्ण स्लीप सिस्टम (Sleep System) काम करत असते.

रचना

झोपेचे नियंत्रण मुख्यतः आपल्या मेंदूमधील हायपोथॅलेमस करतो. 
अंधार पडल्यावर पिनियल ग्रंथी मेलॅटोनीन हे हार्मोन तयार करते, जे शरीराला झोपेचा संदेश देते.

(नक्की वाचा: Protein Side Effects: हाय प्रोटीन डाएट सुरू करताच पोट बिघडतं? मग 'या' 3 चुका वेळीच थांबवा, नाहीतर...)

कार्यप्रक्रिया

प्रकाश कमी झाला की मेलॅटोनीन वाढते. शरीराचं तापमान किंचित कमी होते, हृदयाची गती मंदावते आणि शरीर गाढ झोपेच्या दिशेने जाऊ लागते. याच वेळी शरीराची दुरुस्ती, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं आणि मेंदूमध्ये दिवसभराच्या आठवणी व्यवस्थित साठवण्याचं काम सुरू असते.

(नक्की वाचा: High Protein Veg Meals: वजन पटकन कमी करायचंय? नाश्त्याला बनवा 5 मिनिटांत तयार होणारे 21g प्रोटीन रिच सँडविच)

आयुर्वेदातील माहिती 

आयुर्वेदात निद्रा ही त्रयोपस्तंभ म्हणजेच आरोग्याचे तीन प्रमुख आधारस्तंभांपैकी एक आहे.
रात्री जागरण, मानसिक ताण आणि अनियमित दिनचर्या यामुळे वात दोष वाढतो आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो.

  • रोज एकाच वेळी झोपा आणि उठा.
  • झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाइल आणि स्क्रीन बंद करा.
  • रात्री हलका, पचायला सोपा आहार घ्या.
  • तळपायांना कोमट तिळाच्या तेलाने हलका अभ्यंग करा.
  • आणि झोपण्यापूर्वी "जगदोद्धारणा (Jagadodharana)" सारखे शांत भक्तिगीत ऐका.
  • हे संगीत मन शांत करण्यास, ताण कमी करण्यास आणि झोपेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास मदत करू शकतं.
  • योग्य दिनचर्या आणि शांत झोप अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करू शकते. 

 डॉ. रुचा पै यांची पोस्ट वाचा

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com