Health News: खोकला किंवा शिंकल्यानंतर लघवी बाहेर येते? रोज 10 मिनिटे करा या आसनाचा सराव, समस्या होईल दूर

How To Stop Urine Leakage While Coughing: लघवी गळण्याच्या समस्येमुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का? तर जाणून घेऊया यावर रामबाण उपाय...

जाहिरात
Read Time: 2 mins
"How To Stop Urine Leakage While Coughing:लघवी गळतीची समस्या कशी दूर करावी?"
Canva

How To Stop Urine Leakage While Coughing: काही महिला खोकताना, शिंकताना, हसताना किंवा व्यायाम करतानाही थोडीशी लघवी होण्याची समस्या भेडसावते. वैद्यकीय भाषेत याला  युरिनरी इनकॉंटिनन्स (Urinary Incontinence) असे म्हणतात. ही समस्या केवळ वयोवृद्ध महिलांपुरती मर्यादित नसून तरुणींमध्येही आढळते. तुम्ही देखील या समस्येमुळे त्रस्त असाल तर या लेखातील माहिती तुमच्यासाठी उपयोग ठरू शकते.. योग प्रशिक्षक दीक्षा शर्मा यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर अतिशय सोपा आणि नैसर्गिक उपाय सांगितलाय, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

लघवी गळण्यामागील मुख्य कारणे

दीक्षा शर्मा यांच्या मते, अचानक लघवी होण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे पेल्विक फ्लोअर मसल्स (Pelvic Floor Muscles) कमकुवत होणे. हे स्नायू मूत्राशयाला (ब्लॅडर) आधार देतात. जेव्हा हे स्नायू कमकुवत होतात, तेव्हा खोकताना किंवा शिंकताना पोटावर दाब वाढतो आणि लघवी होऊ शकते. याशिवाय अन्य काही गोष्टीही कारणीभूत असू शकतात, उदाहरणार्थ...

  • गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर ही समस्या उद्भवणे सामान्य बाब आहे.
  • हार्मोनल बदल आणि विशेषतः मेनोपॉजनंतर ही समस्या उद्भवू शकते.
  • वारंवार होणारा युरिन इन्फेक्शन (UTI)
  • ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर

समस्या कशी दूर करावी? 

दीक्षा शर्मा यांनी सांगितलं की, नियमित 10 मिनिटे योगासनांचा अभ्यास केल्यास पेल्विक फ्लोअर मसल्स मजबूत होऊ शकतात, यामुळे मूत्राशयाला चांगला आधार मिळेल आणि लघवी गळण्याची समस्या हळूहळू कमी होईल. 

कोणत्या आसनाचा सराव करावा?

योग प्रशिक्षकाने उत्कटासनाचा सराव करण्याचा सल्ला दिलाय. उत्कटासन हे सोपे आणि प्रभावी आसन आहे, यामुळे मांड्या, नितंब आणि विशेषतः पेल्विक फ्लोअर मसल्स मजबूत होण्यास मदत मिळेल. या आसनामुळे कमरेखालील भागामध्ये रक्तप्रवाह सुधारते आणि ब्लॅडरवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.  

Advertisement
उत्कटासनाचा सराव कसा करावा?
  • योग मॅटवर सरळ उभे राहा आणि पायांमध्ये थोडे अंतर ठेवा.
  • दोन्ही हात वरील बाजूस न्या. 
  • यानंतर पाय गुडघ्यांमध्ये वाकवा, एखाद्या खुर्चीवर बसल्याप्रमाणे तुमच्या शरीराचा आकार दिसेल.  
  • पाठीचा कणा सरळ ठेवावा.  
  • 20–30 सेकंद या स्थितीमध्ये राहावे. 
  • थोड्या वेळाने आसनातून बाहेर यावे. 
  • नियमित या आसनाचा सराव करावा. 

(नक्की वाचा: UTI Prevention Tips: वारंवार युरिन इन्फेक्शन होतंय? या 8 वाईट गोष्टी आहेत कारणीभूत, UTIपासून कसा करावा बचाव?)

या गोष्टीही लक्षात ठेवा
  • सुरुवातीस आसन तुमच्या क्षमतेनुसार करावे. 
  • गुडघे किंवा कंबर दुखत असेल तर डॉक्टर किंवा योगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • योगासनांसह नियमित पुरेशा प्रमाणात पाणीही प्यावे आणि UTIच्या समस्येवर वेळेवर उपचार करा.

लघवी गळणे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही, तर ही एक सामान्य समस्या आहे. पण वेळेवर या समस्येवर उपाय करणं आवश्यक आहे. 

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)