UTI Prevention Tips: मूत्रमार्गामध्ये वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे काही महिला प्रचंड त्रस्त असतात. मूत्रमार्गातील संसर्गामुळे लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे, वारंवार लघवी होणे आणि कधीकधी ताप येण्याच्या समस्येचाही सामना करावा लागतो. या समस्येमागे तुमच्या छोट्या छोट्या सवयी कारणीभूत असू शकतात. याबाबत डॉक्टर सुप्रिया पूरना यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आठ महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
वारंवार UTIची समस्या होण्यामागील कारणं | 8 Reasons For UTI | Urinary Tract Infection
1. चुकीच्या पद्धतीने स्वच्छता करणे
लघवी केल्यानंतर कायम पुढून मागील बाजूने जागा स्वच्छ करावी. मागून पुढील बाजूने लघवीची जागा कधीही स्वच्छ करू नये, असे केल्यास जंतू मूत्रमार्गामध्ये पोहोचू शकतात आणि संसर्गही वाढू शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.
2. अंर्तवस्त्र बाथरूममध्ये सुकवणे
अंर्तवस्त्र कधीही बाथरूममध्ये सुकवू नये, कायम उन्हात सुकवावे. सूर्यप्रकाशामुळे कपड्यांवरील जंतू आणि बुरशीचा नैसर्गिकरित्या खात्मा होतो.
3. अंर्तवस्त्र अन्य कपड्यांसोबत धुणे
अंर्तवस्त्र स्वच्छ करण्यासाठी वेगळा साबण आणि वेगळे पाणी वापरावे, असे न केल्यास कपड्यांवर जंतूसंसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.
4. अंर्तवस्त्र नियमित स्वच्छ न करणे
रोज स्वच्छ धुतलेले अंर्तवस्त्र परिधान करावे, घाणेरडे आणि घामाचे अंर्तवस्त्र परिधान केल्यास संसर्ग वाढू शकतो.
5. घट्ट स्वरुपातील कपडे आणि सिंथेटिक पँटी
घट्ट स्वरुपातील कपडे आणि सिंथेटिक फॅब्रिकमुळे घाम येऊ लागतो, यामुळेही जंतूसंसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या समस्यांपासून बचाव करायचा असेल तर सैल तसेच कॉटनचे कपडे परिधान करावे.
(नक्की वाचा: Belly Fat Loss Tips: रोज घरीच करा 20 मिनिटांचा व्यायाम, Visceral Fat पटकन होईल कमी)
6. टॉवेल आणि इनरवेअर शेअर करणं
स्वतःचे टॉवेल, इनरवेअर किंवा कपडेही दुसऱ्या लोकांसोबत शेअर केल्यास संसर्ग पसरू शकतो.
7. सुगंधित साबण किंवा लिक्विड वॉश
सुगंधित आणि केमिकलयुक्त वॉशचा वापर गुप्तांग स्वच्छ करण्यासाठी वापरू नये. यामुळे गुप्तांगातील नैसर्गिक बॅक्टेरियांचे नुकसान होते, pH बॅलेन्स बिघडते आणि UTIचा धोका वाढतो.
8. पाणी कमी पिणे आणि लघवी थांबवून ठेवणे
दिवसभर जास्त प्रमाणात पाणी प्यावे आणि लघवी थांबवून ठेवू नये, यामुळेही हानिकारक जंतू बाहेर फेकले जातात.
या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केल्यास मूत्रमार्गातील संसर्गाचा धोका निर्माण होणार नाही.
(नक्की वाचा: Sleep Quality: चांगल्या झोपेसाठी डाएटमध्ये 1 गोष्ट खाण्यास करा सुरुवात, गाढ आणि चांगली झोप येईल)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

