Oral Cancer: ना सिगारेट-बिडी ना तंबाखूचं व्यसन;तरीही 21 वर्षाचा तरुण ओरल कॅन्सरने ग्रस्त, कारण ऐकून भरेल धडकी

Oral Cancer Symptoms: भारतामध्ये ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाचा कॅन्सर केवळ तंबाखू खाणाऱ्यांनाच होतो, असे नाहीय. 

जाहिरात
Read Time: 2 mins
"Oral Cancer: 21 वर्षांच्या तरुणाला तोंडाचा कॅन्सर झाला, अतिशय धक्कादायक कारण समोर आलं"
Canva

Oral Cancer Symptoms: बदलती लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये कॅन्सर आजाराचे प्रमाण वाढतंय, यापैकीच एक आहे ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाचा कॅन्सर. सर्वसाधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे की, तंबाखू, गुटखा, बीडी किंवा सिगारेट यासारख्या तंबाखूजन्य गोष्टींच्या सेवनामुळेच कॅन्सर आजार होतो. पण डॉ. अक्षय केवलानी यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. डॉ. केवलानी यांच्या ओपीडीमध्ये आलेल्या एक 21 वर्षीय तरुण तोंडाच्या कॅन्सरने त्रस्त होता, पण त्याने कधीही तंबाखू किंवा सिगारेट यासारख्या गोष्टींचे व्यसन केलं नव्हतं.   

धक्कादायक कारण समोर

डॉक्टरांनी सांगितले की, तरुणाचा एक दात अतिशय तीक्ष्ण होता, ज्यामुळे त्याची जीभ वारंवार कापली जात असे. जीभ सतत कापली जात असल्याने तेथे जखम तयार झाली आणि हळूहळू त्याजागी सूज वाढत गेली. जीभेवर दीर्घकाळ राहिलेल्या सूजेमुळे ओरल कॅन्सरची समस्या निर्माण झाल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. डॉ. केवलानी यांच्या मते, वेळेवर तोंडाची तपासणी केली असती तर ही गंभीर समस्या टाळता आली असती.

भारतामध्ये दात आणि तोंडाच्या समस्यांकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे ओरल कॅन्सरची समस्या बहुतांश वेळेस शेवटच्या टप्प्यात समोर येते. अन्य कर्करोगांच्या तुलनेत ओरल कॅन्सर अधिक वेदनादायी आणि जलद पसरणारा मानला जातो.

तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे | ओरल कॅन्सरची लक्षणे (Symptoms of Oral Cancer)

  • तोंडाच्या कोणत्याही भागात दीर्घकाळ टिकून राहिलेली जखम
  • जीभेवर किंवा गालाच्या आतमध्ये गाठ असणे, पांढरे किंवा लाल रंगाचे डाग
  • बोलताना किंवा घास गिळताना अडथळे येणे
  • तोंडाच्या भागात सतत वेदना जाणवणे 
  • तोंडाला दुर्गंधी येणे
  • जबडा किंवा दात सैल होणे

तोंडाचा कॅन्सर होण्यामागील कारणे | ओरल कॅन्सर होण्यामागील प्रमुख कारणे (Oral Cancer Causes)

  • तंबाखू, गुटखा, बीडी, सिगारेट तंबाखूजन्य गोष्टींचे व्यसन
  • धारदार दातामुळे जीभ वारंवार कापली जाणे
  • तोंडाची योग्य पद्धतीने स्वच्छता न करणे 
  • सतत येणारी सूज किंवा जखम
  • HPV विषाणू
  • अति मद्यपान करणं 

Advertisement

(नक्की वाचा: Irregular Periods: पीरियड्स वेळेवर येत नाही? चिमूटभर उपाय ठरेल प्रभावी, जाणून घ्या योग्य पद्धत आणि फायदे)

डॉ. केवलानी यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहा 
तोंडाच्या कॅन्सरपासून बचाव करण्याचे उपाय| ओरल कॅन्सरपासून बचाव करण्याचे उपाय (Oral Cancer Prevention Tips)
  • दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करावी.
  • दातामुळे जीभ कापली जात असेल तर त्वरित दात फाइल करून घ्यावे.
  • तंबाखू, गुटखा आणि सिगारेटपासून दूर राहा.
  • तोंडाची योग्य स्वच्छता ठेवा.
  • तोंडातील कोणतीही जखम दोन आठवड्यांपेक्षा अधिक राहिल्यास डॉक्टरांना तातडीने संपर्क करावा.
  • पौष्टिक आहाराचे सेवन करा आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असावी. 

Advertisement

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री सतत कूस बदलत राहता का? अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतात नुकसान, गाढ झोपेसाठी वाचा उपाय)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)