Diabetes Treatment: धकाधकीच्या जीवनात लोकांमध्ये मधुमेहाची समस्या वेगाने वाढत आहे. अनेकदा सकस आहाराचे सेवन केल्यानंतरही रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) अचानक वाढते. पण आता एका संशोधनातून अतिशय सोपा उपाय समोर आला आहे. फक्त 3 मिनिटे आपल्या टाचांची हालचाल केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, जेवणानंतर शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. ही पातळी कमी करण्यासाठी 'सोलियस पुश-अप' (Soleus Push-up) हा व्यायाम अत्यंत प्रभावी ठरू शकतो. विशेष म्हणजे हा व्यायाम तुम्ही खुर्चीवर बसूनही करू शकता.
कसा करावा व्यायाम?
सोलियस पुश-अप करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ऑफिस किंवा घरामध्ये खुर्चीवर बसूनही हा व्यायाम करू शकता. खुर्चीवर बसून पाय जमिनीवर ठेवा. पायांची बोटे जमिनीला टेकवा,फक्त टाचा वर उचला आणि पुन्हा खाली ठेवा. ही प्रक्रिया सलग 3 मिनिटे केल्यास शरीरातील चयापचयाची क्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Acholuric Jaundice News: प्रसिद्ध मराठमोळ्या रीलस्टारचं या आजारामुळे निधन! जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपचार)
संशोधनाचा निष्कर्ष
संशोधनानुसार, आपल्या पायाच्या पोटरीमध्ये 'सोलियस' नावाचा स्नायू असतो. हा स्नायू रक्तातील साखर आणि चरबी जाळण्यासाठी प्रभावीपणे काम करतो. अन्य व्यायामांच्या तुलनेत हा स्नायू जास्त वेळ काम करू शकतो. जेवणानंतर अर्ध्या तासाने हा प्रयोग केल्यास त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात.
(नक्की वाचा: Jeera Watar Benefits: जिऱ्याचे पाणी कसे आणि कधी प्यावे? शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती)
त्यामुळे आता जिमला जाण्याची किंवा तासनतास चालण्याची गरज नाही. जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्याची भीती वाटत असेल, तर फक्त 3 मिनिटे आपल्या टाचा वर-खाली करा. या सोप्या उपायामुळे तुमच्या रक्तातील साखर झपाट्याने कमी होऊ शकते, असे नवीन संशोधनातून सिद्ध झाले आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)