Benefits Of Tea Without Sugar: चहा प्यायल्याशिवाय काही लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. काही लोकांसाठी चहा हे पेय अमृतासमान असते. काही लोकांना दूध आणि साखरेचा चहा प्यायला आवडते, ज्याचे आरोग्यासह त्वचेवर दुष्परिणाम होतात. पण काही लोक साखर आणि दुधाचे चहा पिणे टाळतात. काळा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया...
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तुम्ही रोज चहा पित असाल तर त्यामध्ये अतिशय कमी किंवा साखरेचा समावेश करूच नये.
साखरेशिवाय चहा पिण्याचे फायदे | Benefits Of Tea Without Sugar
रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते
साखरेचे अति प्रमाणात सेवन केले तर रक्तशर्करेची पातळी वाढते, यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. साखरेचा समावेश नसलेला चहा प्यायल्यास रक्तशर्करेच्या पातळीवर परिणाम होणार नाहीत. त्यामुळे तज्ज्ञमंडळी देखील मधुमेहग्रस्तांना साखरेशिवाय चहा पिण्याचा सल्ला देतात.
वजन कमी होईल | Weight Loss
जे लोक वजन कमी करण्याचा तसेच साखरेचा चहा पिणे बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकरिता साखरेशिवाय चहा पिणे फायदेशीर ठरू शकते. साखर नसलेल्या चहामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीरात फॅट्स जमा होत नाही. याव्यतिरिक्त चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळेल आणि फॅट्स देखील बर्न होतील.
हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक | Heart Health Tips
कित्येक रीसर्चमधील माहितीनुसार, साखरेच्या अतिरिक्त सेवनामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाची पातळी वाढते; जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे साखरेशिवायच चहा पिण्याचा प्रयत्न करावा. चहामध्ये फ्लेव्होनॉइड्सचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Water After Tea: चहा पिण्यापूर्वी की प्यायल्यानंतर, पाणी कधी प्यावे? बहुतांश लोक करतात ही चूक)
दातांचे आरोग्य
साखरयुक्त चहा प्यायल्यास दातांवरही दुष्परिणाम होतात, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याची भीती असते. साखरेशिवाय चहा प्यायल्यास हा धोका निर्माण होणार नाही.
त्वचेसाठी लाभदायक
चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मांचा समावेश आहे, ज्यामुळे त्वचा आतील बाजूने डिटॉक्स होण्यास मदत मिळते. परिणामी त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
NOTE: दिवसभरात कमीत कमी दोन कपच चहा प्यावा, त्यापेक्षा जास्त प्रमाणात चहा पिणे टाळावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)