
Sulaimani Tea Health Benefits: भारतीयांसाठी चहा हे केवळ पेय नाहीय तर अमृत आहे. चहाच्या एका घोटामुळे दिवसभरातील थकवा दूर होतो. चहा केवळ दूध आणि साखरेपुरता सीमित आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. शतकानुशतके प्यायल्या जाणाऱ्या सुलेमानी चहामुळे (Sulaimani Tea) शरीराला ऊर्जा मिळते, पचनप्रक्रिया सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. दुधाशिवाय तयार केला जाणारा हा चहा दक्षिण भारत आणि अरब देशांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. विशेषतः फिटनेस फ्रीक लोकांसाठी हे पेय पहिली पसंत ठरतेय.
सुलेमानी चहा तयार करण्यासाठी लागणारी सामग्री (Sulaimani Chai recipe)
- दीड कप पाणी
- दोन लवंग
- दोन हिरव्या वेलची
- अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
- पुदिन्याची चार पाने
- एक चमचा चहा पावडर
- एक चमचा लिंबाचा रस
- एक चमचा मध
(नक्की वाचा: Dalchini Chai Benefits: रिकाम्या पोटी दालचिनीचा चहा पिण्याचे फायदे माहिती आहेत का?)

सुलेमानी चहा कसा तयार करावा? (Sulaimani Tea Recipe In Marathi)
- सर्वप्रथम पाणी उकळा.
- पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये लवंग, दालचिनी, पुदिना आणि वेलची मिक्स करा.
- काही वेळ पाणी उकळू द्यावे. पाणी अर्धे झाल्यानंतर त्यामध्ये चहा पावडर मिक्स करा.
- थोड्या वेळाने गॅस बंद करावा. तीन-चार मिनिटांनंतर चहा तसाच ठेवावा.
- यानंतर चहा गाळा. त्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करा.
- तयार आहे आरोग्यवर्धक सुलेमानी चहा.
(नक्की वाचा: Tea Best Recipe: चहा तयार करताना सर्वात आधी काय मिक्स करावे पावडर, साखर की दूध? 90% लोक करतात ही चूक, जाणून घ्या योग्य पद्धत)
सुलेमानी चहा पिण्याचे फायदे (Healthy Tea For Digestion)
- सुलेमानी चहा प्यायल्यानंतर दिवसभरातील थकवा दूर होण्यास मदत मिळेल आणि ताजेतवाने वाटेल.
- चहातील गरम मसाले आणि लिंबाच्या रसामुळे पचनप्रक्रिया मजबूत होईल आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल.
- दालचिनी, लवंग आणि पुदिन्याच्या पानांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊन आजारांविरोधात लढा देण्यास मदत मिळेल.
- सुलेमानी चहा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळेल.
- चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीर डिटॉक्स होते आणि त्वचेवर तेज येण्यास मदत मिळते.
- थकवा आणि ताणतणाव दूर होऊन डार्क सर्कलची समस्याही हळूहळू कमी होण्यास मदत मिळेल.
- पावसाळ्यात शरीराचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world