Good Sleep Tips: धकाधकीच्या जीवनामध्ये शांत आणि गाढ झोप कशी मिळावी? 7 सोप्या टिप्स वाचा

Good Sleep Tips: धकाधकीच्या जीवनात बहुतांश लोक अपुऱ्या झोपेमुळे त्रासलेले असतात. यामुळे शरीराच्या ऊर्जेवरही परिणाम होतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Good Sleep Tips: शांत झोप मिळण्यासाठी सात टिप्स"
Canva

Good Sleep Tips: धकाधकीच्या जीवनामध्ये हल्ली प्रत्येकजण धावपळ आणि तणावामुळे त्रासलेले आहेत. कामाचा ताण, रात्री उशीरापर्यंत लॅपटॉप-मोबाइलचा वापर करणे, अयोग्य लाइफस्टाइल यामुळे शरीर पूर्णपणे थकते पण गाढ झोप मिळत नाही. त्यामुळे झोपून उठल्यानंतरही थकवा जाणवतो आणि चिडचिड होते. पण काही गोष्टींची काळजी घेतली तर शांत झोप मिळण्यास नक्कीच मदत मिळेल. 

1. झोपण्यापूर्वी मोबाइल-लॅपटॉप वापरू नका

मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्हीतून बाहेर फेकल्या जाणाऱ्या निळ्या रंगाच्या लाइटमुळे झोपेवर परिणाम होतात.   
टिप्स: रात्री झोपण्याच्या तासाभरापूर्वी मोबाइल दूर ठेवा आणि झोप येण्यासाठी ध्यानधारणा करा. 

2. हलक्या स्वरुपातील जेवण करा 

पचनास जड असणाऱ्या खाद्यपदार्थांचा रात्रीच्या जेवणात समावेश करू नये. यामुळे झोपेवर परिणाम होतात. 
टिप्स: रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तासांपूर्वी जेवा आणि जेवणामध्ये पचनास हलक्या पदार्थांचा समावेश करावा. 

3. शांत निवांत जागा

झोपेसाठी काळोख असणारी, थंड आणि शांत रूम सर्वात उत्तम ठरेल. 
टिप्स: डिम लाइट्स आणि आरामदायी बिछाण्याचा वापर करावा. 

4. तणाव  

तणाव आणि चिंतेमुळे झोपेवर परिणाम होतात. 
टिप्स: झोपण्यापूर्वी पाच मिनिटे आधी दीर्घ श्वास घ्यावा आणि हलक्या स्वरुपातील स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावे. 

Photo Credit: Gemini AI

5. पुरेशी झोप

दरदिवशी वेळीअवेळी वेळी झोपणे तसेच सकाळी उठणे यामुळे शरीराच्या झोपेचे घड्याळ बिघडते.  
टिप्स: नियमित वेळेवर झोपा आणि सकाळी वेळेवर उठा.

Advertisement

(नक्की वाचा: Sleep Tourism: स्लीप टुरिझम म्हणजे काय? शांत झोप मिळवण्यासाठी लोक का करतायेत प्रवास, काय आहे ट्रेंड?)

6. कॅफीन आणि साखरेवर नियंत्रण ठेवा 

कॉफी, चहा आणि गोड पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करणं टाळावे. 
टिप्स: संध्याकाळनंतर कफीनयुक्त पदार्थ खाणेपिणे टाळावे आणि झोपण्याच्या दोन तासांपूर्वी कोमट दूध प्यावे.

(नक्की वाचा: Better Sleep Tips: झोपेतून उठून वारंवार टॉयलेटमध्ये जावं लागतं? झोपण्यापूर्वी करा 2 सोपी कामं, मिळेल गाढ झोप)

7. चांगल्या झोपेसाठी उपाय 

सकाळी कोवळे ऊन अंगावर घ्या.
दिवसभरात 20–30 मिनिट व्यायाम करावा.
झोपण्यापूर्वी कोमट दूध किंवा हर्बल टी प्यावा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)