Glowing Skin Tips: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसावा, यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. काही लोक महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात, तर काही लोक डाएट फॉलो करतात. डाएटमध्ये सुकामेव्याचा समावेश करणं अधिक फायदेशीर ठरेल, यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यासह त्वचा निरोगी देखील राहते. कॉस्मेटोलॉजिस्ट निधी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर सुकामेव्यांबाबतची माहिती दिलीय. कोणत्या सुकामेव्यामुळे त्वचेवर कोणते परिणाम होतात, याबाबत तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेऊया...
बदाम (Almonds For Skin)
कॉस्मेटोलॉजिस्ट निधीने सांगितलं की, जर तुम्ही रोज चार ते पाच बदाम खाल्ले तर त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळेल तसेच त्वचा मऊ होईल. बदाममध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण अधिक असते, यामुळे त्वचेला आतील बाजूनं पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो तसेच पिगमेंटेशनची समस्याही दूर होईल.
अक्रोड (Walnuts For Skin)
अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात असते, यामुळे त्वचेचा लवचिकपणा आणि कोलेजनचा स्त्रावही वाढतो. कोलेजनमुळे त्वचा निरोगी आणि तरुण दिसते.
काजू (Cashews For Skin)
काजूमध्ये कॉपरचे घटक असतात, यामुळे त्वचेचा पोत सुधरण्यास मदत मिळेल आणि त्वचा नैसर्गिकरित्या मऊ होईल.
(नक्की वाचा: Lavang Benefits: रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होतं? 1 दिवसात किती लवंग खावी? न्युट्रिशनिस्टने सांगितली माहिती)
हेजलनट्स (Hazelnuts For Skin)
हेजलनट्समध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप असते, यामुळेही कोलेजनचे उत्पादन होण्यास मदत मिळते. हेजलनट्समधील पोषणतत्त्वांमुळे त्वचा निरोगी आणि सतेज होण्यास मदत मिळेल.
ब्राझील नट्स (Brazil nut For Skin)ब्राझील नट्समध्ये सिलेनियमचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे त्वचा डिटॉक्स होण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते, त्वचेवर नैसर्गिक तेज येते.
(नक्की वाचा: Green Tea Benefits: सलग 30 दिवस ग्रीन टी प्यायल्यास काय होतं? 1 दिवसात किती ग्रीन टी प्यावा?)
पिस्ता (Pistachios For Skin)पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन B6 चे प्रमाण अधिक असते, जे त्वचेतील तेलाचा स्त्राव संतुलित प्रमाणात करण्याचे काम करते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

