Chewing Curry Leaves Benefits: सलग 15 दिवस रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास काय होईल?

Curry Leaves Benefits: कढीपत्त्यामुळे स्वयंपाकाची चव वाढतेच शिवाय आरोग्यासाठीही ही पाने फायदेशीर असतात. सलग 15 दिवस कढीपत्त्याची पाने खाल्ल्यास शरीरामध्ये कोणकोणते बदल होऊ शकतात, जाणून घ्या सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
Chewing Curry Leaves Benefits: कढीपत्ता चावून खाण्याचे फायदे
Canva

Chewing Curry Leaves Benefits: भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कढीपत्त्याचे विशेष स्थान आहे. कढीपत्त्याशिवाय कित्येक पाककृती अपूर्णच आहेत, असे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्वयंपाकाच्या फोडणीमध्ये तसेच कच्च्या स्वरुपातही कढीपत्ता खाल्ला जातो. कढीपत्त्याचे योग्य प्रमाणात सेवन केले तर केसांसह संपूर्ण आरोग्यास फायदे मिळतील. या इवल्याशा पानांमध्ये कित्येक औषधी गुणधर्मांचा साठा आहे, म्हणून तज्ज्ञमंडळी डाएटमध्ये कढीपत्त्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात. सलग 15 दिवस कढीपत्ता चावून खाल्ल्यास आरोग्यास कोणकोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

त्वचेवर नैसर्गिक चमक येईल

कढीपत्त्यामध्ये अँटी-ऑक्सिंडट्सचे गुणधर्म आहेत, रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. 

कोलेस्टेरॉल 

शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असल्यास सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाच ते सात पाने चावून खा. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळले. 

पचनप्रक्रिया

सलग 15 दिवस रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. 

रोगप्रतिकारकशक्ती

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. नियमित कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल आणि शरीराचे कित्येक आजारांपासून संरक्षण होईल. 

(नक्की वाचा: Curry Patta Saunf Water: कढीपत्ता आणि बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे)

वेट लॉस

नियमित कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स घटण्यास मदत मिळू शकते. 

सुंदर केस 

त्वचेप्रमाणे केसांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. केसगळती, केसांचे तुटणे यासारख्या समस्या कमी होतील आणि केस काळे, घनदाट, लांबसडक होण्यास मदत मिळेल. 

Advertisement

(नक्की वाचा: Curry Leaves Benefits: रोज रिकाम्या पोटी 7 कढीपत्ता चावून खाण्याचे फायदे)

कढीपत्त्याचे कसे करावे सेवन?

  • सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची चार ते पाच पाने स्वच्छ धुऊन चावून खा. 
  • भाजी किंवा डाळीमध्येही कढीपत्त्याचा समावेश करू शकता.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Topics mentioned in this article