Raw Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास काय होते, लसणाचं कोणी करावं सेवन? जाणून घ्या फायदे

Raw Garlic Benefits: लसणामुळे स्वयंपाकाची चव वाढतेच शिवाय आरोग्यासही असंख्य फायदे मिळतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे"
Canva

Raw Garlic Benefits: लसणाच्या फोडणीशिवाय भारतीय स्वयंपाक अपूर्णच आहे, असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. डाळ, भाजीमध्ये लसणाचा आवर्जून वापर केला जातो. जेवणाची चव वाढतेच शिवाय यातील पोषणतत्त्वांमुळे आरोग्यासही असंख्य फायदे मिळतात. कच्चे लसूण देखील रिकाम्या पोटी खाणे फायदेशीर मानले जाते. 

लसणातील पोषणतत्त्व | Raw Garlic Nutritional Value

लसणामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, मॅग्नीज, सेलेनियम, अ‍ॅलिसिन नावाचे कम्पाउंड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, लोह आणि कॉपर यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. निरोगी शरीरासाठी ही पोषणतत्त्वं आवश्यक आहेत.  रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे आणि योग्य पद्धत जाणून घेऊया.

कच्च्या लसणाचे सेवन कसे करावं? (How To Consume Raw Garlic)

डाएटमध्ये लसणाचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करू शकता. सुरुवातीस अर्धे लसूण खाण्यास सुरुवात करा, हळूहळू अख्खे लसूण खाऊ शकता. लसणाचे छोटे-छोटे तुकडे करुनही खाऊ शकता. लसूण मधामध्ये बुडवूनही खाऊ शकता, यानंतर कोमट पाणी प्यावे. 

कच्चे लसूण खाण्याचे फायदे (Health Benefits of Eating Raw Garlic)

1. कोलेस्टेरॉल

लसूणमधील पोषणतत्त्व शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. नियमित कच्चे लसूण खाल्ल्यास रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होईल, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. 

Advertisement

2. संधिवात 

संधिवाताची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी लसूण खाणे वरदान ठरू शकते. लसणातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांध्यावरील सूज कमी होण्यास मदत मिळते. नियमित लसूण खाल्ल्यास संधिवातामुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळेल. 

Advertisement

(नक्की वाचा: Lemon Benefits: रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावे का, दिवसभरात किती लिंबांचं सेवन करावे, फायद्या-तोट्यांसह 18 प्रश्नांची उत्तर वाचा)

3. सर्दी-खोकला 

हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास होणे सामान्य बाब आहे. या समस्येवर उपाय म्हणून लसणाचे सेवन करू शकता. लसणातील अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-वायरल गुणधर्म शरीराचे संसर्गापासून संरक्षण करतात. लसणाच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास आणि सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.  

Advertisement

(नक्की वाचा: Stomach Cleansing Tips: पोटातील घाण सकाळी पटकन येईल बाहेर, फक्त खा ही आयुर्वेदिक पावडर)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)