Feet Massage: रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना नारळ तेल लावल्यास काय होईल? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Benefits Of Feet Massage In Marathi: रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना तेल लावल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतील? जाणून घ्या महत्त्वाची माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Benefits Of Feet Massage : झोपण्यापूर्वी तळव्यांचा मसाज करण्याचे फायदे"

Benefits Of Feet Massage In Marathi: आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांचा मसाज करणे फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदामध्ये या प्रक्रियेस 'पादाभ्यंग' असे म्हणतात. पायांचा मसाज केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतात आणि मसाज करण्याची योग्य पद्धत तज्ज्ञांकडून जाणून घेऊया...

आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय सल्ला दिला?

आयुर्वेदिक डॉक्टर मालविका तांबे यांनी यू-ट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पायांचा तेलाने मसाज करण्याचे फायदे सांगितले आहेत.

पायाच्या त्वचेचा रुक्षपणा कमी होतो 

सर्वप्रथम पायाच्या त्वचेचा रुक्षपणा आणि तळव्यांना पडलेल्या भेगा दूर होण्यास मदत मिळू शकते. 

(नक्की वाचा: Feet Massage With Ghee: झोपण्यापूर्वी तुपाने पायांचा मसाज करण्याचे फायदे)

तणाव कमी होईल

डॉक्टर मालविका यांनी सांगितले की, आयुर्वेदानुसार आपल्या शरीराच्या कित्येक नसांचे मूळ पायांमध्ये असतात. पायांचा तेलाने मसाज केल्यास नसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे तणाव कमी होतो आणि चांगली झोप येण्यास मदत मिळते. 

सायटिका समस्येवर रामबाण उपाय 

रात्री झोपण्यापूर्वी पायांचा तेलाने मसाज केल्यास कंबरदुखी किंवा सायटिकेच्या समस्येतूनही सुटका मिळू शकते.   

पित्ताची समस्या

डॉक्टर मालविका यांच्या मते, नारळाच्या तेलामुळे पायांना थंडावा मिळेल आणि पोषणतत्त्वांचाही पुरवठा होईल. यामुळे पित्त संतुलित होऊन शरीरातील उष्णतेची समस्या कमी होण्यास मदत मिळेल. 

(नक्की वाचा: पायासह तळव्यांचा मसाज करण्याचे अद्भुत फायदे)

डोळ्यांसाठी लाभदायक 

नियमित पादाभ्यंग केल्यास डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल आणि मानसिक थकवा देखील दूर होईल. 

चेहऱ्यावर येईल चमक 

रात्री झोपण्यापूर्वी पायांना नारळाचे तेल लावून मसाज केल्यास चेहऱ्यावर तेजही येईल.

पायांचा मसाज करण्याची काय आहे योग्य पद्धत?

डॉक्टर मालविका यांनी सांगितले की, पादाभ्यंग करण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे रात्रीची वेळ. झोपण्यापूर्वी तुम्ही स्वतः पायांचा मसाज करू शकता किंवा अन्य कोणाची तरी मदत घेऊ शकता. नारळाचे तेल हलकेसे गरम करा. यानंतर 10 मिनिटे पायांचा मसाज करावा. यामुळे शरीरातील पित्ताची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.   
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Advertisement