Health News: धावपळीच्या युगात सध्या तणाव, थकवा आणि कमकुवतपणाच्या समस्येमुळे बहुतांश लोक त्रासलेले आहेत. दिवसभर कामात व्यस्त राहणे, धावपळ होणे, तास-न्-तास एकाच ठिकाणी उभे राहणे यामुळे शारीरिक समस्या निर्माण होणे ही सामान्य बाब आहे. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित 10 मिनिटे भिंतीवर पाय ठेवून उलटं झोपावे. महिला आरोग्यतज्ज्ञ निधी कक्कडने याबाबतची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. 10 मिनिटे हा व्यायाम केल्यास मेंदूसह संपूर्ण शरीराला असंख्य फायदे मिळतील, जाणून घेऊया माहिती...
भिंतीवर पाय ठेवून उलटं झोपण्याचा कसा करावा सरावा? | Legs Up the Wall Exercise
- जमिनीवर किंवा योगमॅटवर पाठीच्या बाजूनं झोपावे.
- पाठ सरळ ठेवावी आणि पाय भिंतीवर ठेवा.
- योगमध्ये या स्थितीत विपरित करणी मुद्रा असे म्हणतात.
- हात सैल सोडा आणि दीर्घ श्वास घ्या.
- पाच ते 10 मिनिटे या स्थितीमध्ये राहावे.
विपरित करणी मुद्रेचा सराव केल्यास कोणते फायदे मिळतील?
ऑक्सिजनचा पुरवठा
निधी कक्कड यांनी सांगितलं की, पाय भिंतीवर ठेवून उलटं झोपल्याने गुरुत्वाकर्षणाच्या (Gravity) मदतीने पायांच्या दिशेने वरील बाजूने म्हणजे हृदय आणि मेंदूच्या दिशेने रक्तप्रवाह वाढतो. यामुळे ऑक्सिजनचाही पुरवठा वाढतो.
बॉडी डिटॉक्स
विपरित करणी मुद्रेचा सराव केल्याने लिंफेटिक सिस्टम सक्रिय होण्यास मदत मिळते, ज्यामुळे अवयवांवरील सूज कमी होण्यास आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
ताण कमी होतो
विपरित करणी मुद्रेच्या सरावामुळे संपूर्ण शरीर तणावमुक्त होते, ज्यामुळे मज्जासंस्थाही शांत होते. हळूहळू श्वास घेतल्यास मेंदू शांत होतो.
पचनप्रक्रियानियमित 10 मिनिटे या आसनाचा सराव केल्याने पचनप्रक्रिया सुधारते. पोट फुगण्याची समस्याही कमी होते.
(नक्की वाचा: Arthritis Remedies: हिवाळ्यात सांधे जास्त का दुखतात? वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा 8 टिप्स)
पायांचे दुखणे कमी होईलविपरित करणी मुद्रेमुळे पायांचे दुखणे, थकवा आणि सूज कमी होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Skin Care: त्वचेवर ग्लो येण्यासाठी 7 दिवस प्या 7 ज्युस, चेहऱ्यासाठी सर्वात बेस्ट पेय कोणते? वाचा माहिती)
विपरित करणी मुद्रेचा सराव कधी करावा?निधी कक्कड यांच्या मते, रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा दिवसभरात कधीही 10 मिनिटे या आसनाचा सराव करू शकता.
यामुळे शरीराला आराम मिळेल, मेंदू शांत होईल आणि थकवाही दूर होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)