जाहिरात

Skin Care: त्वचेवर ग्लो येण्यासाठी 7 दिवस प्या 7 ज्युस, चेहऱ्यासाठी सर्वात बेस्ट पेय कोणते? वाचा माहिती

Skin Care: सलग सात दिवस ज्युस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते का? चेहऱ्यावर चमक येण्यासाठी कोणते पेय प्यावे? 

Skin Care: त्वचेवर ग्लो येण्यासाठी 7 दिवस प्या 7 ज्युस, चेहऱ्यासाठी सर्वात बेस्ट पेय कोणते? वाचा माहिती
"Skin Care Tips: सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी 7 दिवस 7 ज्युस"
Canva

Skin Care: दिवसभर काम केल्यानंतर प्रचंड थकवा आणि सुस्ती येते. शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी काहीतरी जादू व्हावी, शरीरात उत्साह संचारावा असं वाटतं. हा विचार करण्याऐवजी थकवा दूर करण्यासाठी तुम्ही ज्युस पिण्याचा पर्याय निवडू शकता. फळं आणि भाज्यांपासून तयार केलेल्या ज्युसद्वारे शरीराला व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होईल तसेच शरीर डिटॉक्सही होईल. तसेच चेहऱ्यावर ग्लो येण्यासही मदत मिळते. डाएटमध्ये कोणत्या ज्युसचा समावेश करावा, जाणून घेऊया माहिती... 

चमकदार त्वचेसाठी ज्युस 

1. डाळिंबाचा रस 

डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे हृदय निरोगी राहते आणि रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुधारते. यातील पॉलीफेनॉल्स तत्त्वांमुळे त्वचेवर चमक येते, वृद्धत्वाची लक्षणं कमी होतात. नियमित डाळिंबाचा रस प्यायल्यास शरीराला ऊर्जाही मिळेल.

2. संत्र्याचा रस 

व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत म्हणजे संत्रे. यामुळे सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळेल. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल आणि थकवा दूर होईल. नाश्त्यामध्ये संत्र्यांचा ज्युस प्यायल्यास संपूर्ण दिवस शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळेल. 

3. आवळ्याचा रस 

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण सर्वाधिक असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल, संसर्गापासून शरीराचे संरक्षण होईल. यकृत निरोगी राहील.  

4. बीट ज्युस  

बीट ज्युस प्यायल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. यातील नायट्रेट्समुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते आणि स्नायू बळकट होतात.

Better Sleep Tips: रात्री झोपल्यानंतरही दिवसा देखील गाढ झोप का येते? ही आहेत गंभीर कारणं

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री झोपल्यानंतरही दिवसा देखील गाढ झोप का येते? ही आहेत गंभीर कारणं)

5. कोरफड ज्युस 

कोरफडीचा ज्युस प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील. त्वचा आणि केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. 

Vitamin D: उन्हाव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी कसे मिळवावे? या टिप्स फॉलो केल्यास रॉकेट स्पीडने वाढेल Vitamin D 

(नक्की वाचा: Vitamin D: उन्हाव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी कसे मिळवावे? या टिप्स फॉलो केल्यास रॉकेट स्पीडने वाढेल Vitamin D)

6. लिंबाचा रस 

त्वचेसाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे लिंबाचा रस. यातील व्हिटॅमिन सीमुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल आणि वजनही कमी होण्यास मदत मिळेल.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com