जाहिरात

Chia Seeds Benefits: चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ, सकाळी की संध्याकाळी? शरीराला मिळतील मोठे फायदे

Chia Seeds Benefits: चिया सीड्स कोणत्या वेळेस खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतील, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Chia Seeds Benefits: चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ, सकाळी की संध्याकाळी? शरीराला मिळतील मोठे फायदे
Chia Seeds Benefits: चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ?

Chia Seeds Benefits: सुपरफुडच्या यादीमध्ये चिया सीड्सचाही समावेश केला जातो. चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी, खनिज, अँटी-ऑक्सिडंट्स या गुणधर्मांचा समावेश आहे. पण चिया सीड्सचे कोणत्या वेळेस सेवन करावे, याची योग्य माहिती बहुतांश लोकांना नसते. चिया सीड्स योग्य वेळेस खाल्ल्यास आरोग्यास असंख्य लाभ मिळू शकतात. जाणून घेऊया तुमच्या फायद्याची माहिती... 

(नक्की वाचा: Chia Seeds With Milk: दुधामध्ये चिया सीड्स भिजवून खाण्याचे फायदे)

चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ (What Is The Right Time To Eat Chia Seeds)

  1. चिया सीड्स सकाळच्या वेळेस खाणे आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे चयापचयाची क्षमता मजबूत होईल. चिया सीड्समधील फायबर, प्रोटीन आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडमुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते. 
  2. चिया सीड्स रात्रभर पाण्यात किंवा दुधामध्ये भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ शकता. ओट्स, सॅलेडमध्येही चिया सीड्सचा समावेश करू शकता. यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहील, वारंवार भूक लागणार नाही आणि वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 
  3. संध्याकाळच्या वेळेसही चिया सीड्स खाऊ शकतात, यामुळे चांगली झोप येईल. तसेच शरीर डिटॉक्स देखील होईल. 
  4. वर्कआऊट करण्यापूर्वी देखील चिया सीड्स खाऊ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरातील फॅट्स जलदगतीने बर्न होण्यास आणि स्नायू तयार होण्यास मदत मिळेल. व्यायाम करण्याच्या तासाभरापूर्वी ग्लासभर पाण्यात चिया सीड्स पाण्यात भिजत ठेवा.  
  5. जेवणानंतर देखील चिया सीड्सचे सेवन करू शकता. यामुळे पचनप्रक्रिया सुधारेल आणि वारंवार भूक देखील लागणार नाही. चिया सीड्स तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता. 
  6. चिया सीड्स दिवसभरात तुम्ही कधीही खाल्ल्यास आरोग्यास फायदेच मिळतील. पण सकाळच्या वेळेस चिया सीड्स खाणे अधिक लाभदायक ठरेल. कारण यामुळे शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकून राहील आणि शरीराची चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com