Better Sleep Tips: रात्री झोपल्यानंतरही दिवसा देखील गाढ झोप का येते? ही आहेत गंभीर कारणं

Excessive Daytime Sleepiness: रात्री झोपल्यानंतरही दिवसभरातही वारंवार झोप येण्याच्या समस्येस हायपरसोमनिया असे म्हणतात. यामुळे दिवसभर सुस्तपणा जाणवतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Excessive Daytime Sleepiness: दिवसा देखील झोप का येते?"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • रात्री आठ ते नऊ तास झोप घेतल्यावरही दिवसा झोप येणे आणि थकवा जाणवणे हायपरसोमनिया या स्थितीचे लक्षण आहे
  • झोप मोडणे, अनियमित झोपण्याच्या वेळा, मोबाइल वापर आणि औषधांचे दुष्परिणाम दिवसा झोप येण्यामागील प्रमुख कारणे
  • झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवावी
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Sleeping Tips: रात्री आठ ते नऊ तास झोपल्यानंतरही झोप पूर्ण झाल्यासारखं काही लोकांना वाटत नाही. सकाळी डोळे उघडत नाही आणि पुन्हा झोप आल्यासारखे जाणवते. यामुळे कामावर लक्ष्य केंद्रीत होत नाही, आळस वाढतो.  तसंच शारीरिक थकवाही जाणवतो. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर या लेखाद्वारे महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या. 

दिवसा देखील झोप का येते? 

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, रात्री पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यानंतरही दिवसा झोप येण्याच्या समस्येस हायपरसोमनिया (Excessive Daytime Sleepiness) असे म्हणतात. यामुळे व्यक्तीला दिवसभर सुस्तपणा जाणवतो. डोळ जड झाल्यासारखे जाणवतात.   

जास्त झोप येण्यामागील कारणं

रिपोर्टमधील माहितीनुसार, जास्त प्रमाणात झोप येण्यामागील कारणं पुढीलप्रमाणे असू शकतात...  

  • रात्री वारंवार झोप मोड होणे
  • झोपणे आणि सकाळी उठण्याच्या अनियमित वेळा 
  • झोपण्यापूर्वी फोन पाहणे
  • काही औषधांचे दुष्परिणाम 
  • मद्यपान आणि कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन करणे
  • अधिक तणाव असणे 

जास्त प्रमाणात झोप येत असेल तर काय उपाय करावे?

रिपोर्टमधील माहितीनुसार, कित्येकदा तुम्ही रात्रीची आठ तासांची झोप घेता पण गाढ झोप येत नाही. झोपेच्या वेळांप्रमाणे झोपण्याची पद्धतही योग्य असल्याची पाहिजे. उदाहरणार्थ...

  • झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करावी.
  • झोपताना रुममधील प्रकाश आणि गोंधळ कमी असावा. 
  • झोपण्यापूर्वी टीव्ही आणि मोबाइलपासून दूर राहा.   
  • झोपण्याच्या दोन तासांपूर्वी जेवण करुन घ्यावे. 
  • रात्री काम करत असाल किंवा फोन पाहत तर झोपेवर दुष्परिणाम होतील, त्यामुळे काम दिवसभरातच आटोपण्याचा प्रयत्न करावा. 

Advertisement

(नक्की वाचा: Clove Water: 15 दिवस रोज रिकाम्या पोटी लवंगचे पाणी प्यायल्यास कोणते आजार दूर होतील?)

औषधोपचार

काही औषधांमुळे झोप येऊ शकते, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

गाणी ऐका

सुस्ती आल्यानंतर गाणी ऐका म्हणजे झोप कमी होईल.   

(नक्की वाचा: Drinking Hot Water Side Effects: सकाळी रिकाम्या पोटी कोणी गरम पाणी पिऊ नये? कारणं वाचून बसेल मोठा धक्का)

थोडा वेळ चाला

तास-न्-तास एकाच ठिकाणी बसून झोप येत असेल तर एक ते दोन तासांत पाच मिनिटे वॉक करा. व्यायाम होऊन झोप कमी होईल आणि लक्ष्य देखील केंद्रीत होईल.  

Advertisement
मद्यपान आणि कॅफीन

मद्यपान आणि कॅफीनयुक्त पेयांमुळे झोपेवर दुष्परिणाम होतात, त्यामुळे या गोष्टी वर्ज्य करण्यावर भर द्यावा. 
  
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)