Curd Eating Benefits: थंडीमध्ये रोज 1 वाटी दही खाल्ल्यास काय होते, कोणते आजार होतील दूर?

Curd Eating Benefits: रोज एक वाटी दही खाल्ल्यास आरोग्यास कोणकोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Curd Eating Benefits: दही खाण्याचे दुष्परिणाम"
Canva

Curd Eating Benefits: भारतीय पाककृतींमध्ये दही केवळ चव वाढवण्यासाठी वापरले जात नाही, यातील घटक शरीरासाठी नैसर्गिक औषधाप्रमाणे कार्य करतात. दही खाण्याचे असंख्य फायदे आहेत, म्हणून यास सुपरफुडही म्हटले जाते. दह्यातील प्रोबायोटिक्स म्हणजे चांगले बॅक्टेरिया शरीराची पचनशक्ती आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. हिवाळा ऋतूमध्ये दही खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...  

दही खाल्ल्यास कोणकोणते आजार दूर होतील?

1. पचनप्रक्रियेसाठी वरदान  

दह्याच्या सेवनामुळे पोटाला आराम मिळतो. जेव्हा आतड्यांमधील बॅक्टेरियांचे संतुलन बिघडते, तेव्हा बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. दह्यातील प्राबोयोटिक्समुळे या समस्या दूर होण्यास मदत मिळते.  नियमित दह्याचे सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य निरोगी राहील, आतड्यांचे आरोग्य निरोगी होण्यासह बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल. 

2. रोगप्रतिकारकशक्ती

दह्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. रीसर्चनुसार शरीराची रोगप्रतिकारकशक्ती 70 टक्के आतड्यांशी जोडलेली असते. जेव्हा आतडे निरोगी असतात तेव्हा शरीर संसर्गाविरोधात लढण्यास अधिक सक्षम असते.

3. हाडे मजबूत होतील

दह्यामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. सांध्याचे दुखणे कमी होईल. पण जास्त प्रमाणात दही खाणे टाळावे.

Advertisement

4. हृदय 

दह्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचे तत्त्व शरीरातील सोडिअमचे बाहेर फेकण्यास मदत करतात, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. दह्यातील पोषणतत्त्व खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करतात.  

Advertisement

(नक्की वाचा: Curd Benefits: दही कोणत्या महिन्यात खाऊ नये, दही खाण्याची योग्य वेळ कोणती? नुकसान-फायद्यांसह जाणून घ्या 8 FAQs)

5. वेटलॉस आणि रक्तशर्करा  

दह्यातील प्रोटीन आणि कॅल्शिअममुळे शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळेल, ज्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होतील. तसेच रक्तशर्करेची पातळी देखील संतुलित राहील.

6. त्वचा आणि केस होतील सुंदर 
  • दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे डेड स्किनची समस्या दूर होते, यासह त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होतील. 
  • केसांमधील कोंडा देखील कमी होईल आणि केस मुळासकट मजबूत होतील.   
  • नियमित एक वाटी दही खाल्ल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)