जाहिरात

Curd Benefits: दही कोणत्या महिन्यात खाऊ नये, दही खाण्याची योग्य वेळ कोणती? नुकसान-फायद्यांसह जाणून घ्या 8 FAQs

Curd Benefits In Marathi: दही कधी खावे आणि कधी खाऊ नये? दही खाण्याची योग्य पद्धत काय? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Curd Benefits: दही कोणत्या महिन्यात खाऊ नये, दही खाण्याची योग्य वेळ कोणती? नुकसान-फायद्यांसह जाणून घ्या 8 FAQs
"Curd Benefits In Marathi: दही खाण्याचे फायदे"
Canva

Curd Benefits: दही म्हणजे भारतीय खाद्यसंस्कृतीतील महत्त्वपूर्ण भाग. शतकानुशतके भारतीय खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात दह्याचा वापर केला जातो. चवीप्रमाणे दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते. दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी-12, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसह अनेक आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे. प्रोबायोटिक्सचे उत्तम स्त्रोत म्हणजे दही. दह्यातील चांगल्या बॅक्टेरिया पचनप्रक्रिया निरोगी ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.  

दह्याचे सेवन कसे करावे? How To Eat Curd

कोशिंबीर, लस्सी, ताक, कढी यासारख्या पदार्थांचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता. ग्रामीण भागामध्ये आजही भात किंवा पोळीसोबत दही खाल्ले जाते. दही योग्य वेळेस आणि योग्य प्रमाणात खाल्ले तर शरीरास कित्येक फायदे मिळतील. दह्याचे सेवन कसे करावे? दह्याचे सेवन कधी करू नये? दह्याचे सेवन कधी करावे? यासह महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया...

1. दह्याचे सेवन कधी करावे? (Dahi Kadhi Khave)

दिवसभरात दही कधीही खाऊ शकता, म्हणजे सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण या वेळा दही खाण्यासाठी योग्य ठरतील. यादरम्यान शरीराची पचनशक्ती अधिक सक्रिय असते आणि दह्यातील पोषणतत्त्व शरीर योग्य पद्धतीने शोषूनही घेते. संध्याकाळनंतर दही खाणे टाळावे.

2. दही खाण्याची सर्वात उत्तम वेळ| Dahi Khanyachi Uttam Vel 

  • सकाळचा नाश्ता: सकाळच्या नाश्त्यामध्ये दह्याचा समावेश करणे फलदायी ठरू शकते. यामुळे पोट शांत राहील आणि यातील प्रोटीनमुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहील. नाश्त्यामध्ये फळं किंवा ओट्ससह दही खाऊ शकता. 
  • दुपारचे जेवण: दही दुपारच्या जेवणासह किंवा जेवणानंतर खाणेही फायदेशीर ठरेल. जेवणासह दही खाल्ल्यास अन्नाचे पचन सहजरित्या होईल. पोटाला थंडावा मिळेल.  

3. दही कधी खाऊ नये? | Dahi Kadhi Khau Naye 

दही रात्रीच्या वेळेस खाणे टाळावे. यामुळे कफ, सर्दी-खोकला होऊ शकतो. पचनप्रक्रिया देखील धिम्या गतीने होईल. दमा आणि संधिवाताची समस्या असणाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस दही खाणे टाळावे. 

Raw Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास काय होते, लसणाचं कोणी करावं सेवन? जाणून घ्या फायदे आणि योग्य पद्धत

(नक्की वाचा: Raw Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास काय होते, लसणाचं कोणी करावं सेवन? जाणून घ्या फायदे आणि योग्य पद्धत)

4. दही कोणत्या महिन्यामध्ये खाऊ नये? (Dahi Kontya Mahinyat Khau Naye)

ठराविक महिन्यामध्ये दही पूर्णपणे खाणे वर्ज्य करणं आवश्यक नाही, पण पावसाळा आणि हिवाळा ऋतूमध्ये दही खाणे टाळावे. मर्यादित स्वरुपात दह्याचे सेवन करावे. जास्त प्रमाणात सेवन केले शरीरामध्ये वात दोष वाढेल. 

5. दही खाण्याचे 10 फायदे (Dahi Benefits)

  • दह्यामध्ये प्रोबायोटिक्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतील.
  • दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरियांचा खात्मा करतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 
  • दह्यातील कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीमुळे हाडे आणि दात मजबूत होतात. ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते.  
  • दह्यामध्ये प्रोटीनचेही प्रमाण जास्त असते, यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. परिणामी वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
  • दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते, ज्यामुळे त्वचा नैसर्गिक स्वरुपात एक्सफोलिएट होण्यास मदत मिळते आणि केसांनाही पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.  
  • दह्यातील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम घटकांमुळे रक्तदाबाची पातळी संतुलित राहते तसेच हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.  
  • दह्यातील प्रोबायोटिक्समुळे तणाव आणि चिंता यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
  • दह्यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत मिळेल.  
  • दह्यातील पोषणतत्त्वांमुळे चांगली झोप येण्यास मदत मिळेल. 
  • वर्कआउटनंतर दही खाल्ल्यास शरीराला प्रोटीनचा पुरवठा होईल, शरीराची झालेली झिज भरुन निघेल. 

6. दही खाण्याचे 10 दुष्परिणाम (Side Effects Of Dahi) 

  • रात्रीच्या वेळेस दही खाल्ल्यास कफ, सर्दी-खोकला यासारख्या समस्या वाढू शकतात. 
  • मर्यादित स्वरुपात दह्याचे सेवन केले नाही तर संधिवाताची समस्या अधिक वाढू शकते.  
  • दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आहेत, पण जास्त प्रमाणात दह्याचे सेवन केले तर बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारखा त्रास होऊ शकतो.  
  • दह्यामध्ये साखर मिक्स करुन खाल्ल्यास वजन वाढू शकते, कारण कॅलरीजचे प्रमाण वाढते. 
  • रात्रीच्या वेळेस दही खाल्ले तर पचनप्रक्रियेवर परिणाम होतील, ज्यामुळे पोट जड झाल्यासारखे वाटेल. 
  • दह्याची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांनी दही खाणे टाळावे. पोटामध्ये गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते.  
  • दह्याची अ‍ॅलर्जी असल्यास त्वचेवर खाज तसेच रॅशेज येऊ शकतात. 
  • जास्त प्रमाणात दही खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी होऊ शकते. 
  • संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस दही खाल्ल्यास त्वचेशी संबंधित समस्या उदाहरणार्थ पिंपल्स येऊ शकतात.  
  • मासे, पनीर, गरम पेयांसोबत दही खाणे टाळावे, यामुळे पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम होऊ शकतात.  

7. दह्याची प्रकृती कशी असते? (Dahyachi Prakruti)

Loaded Water Social Media Trend: लोडेड वॉटर म्हणजे काय? फिटनेसप्रेमींमधील नव्या ट्रेंडचा धुमाकूळ, वाचा फायदे

(नक्की वाचा: Loaded Water Social Media Trend: लोडेड वॉटर म्हणजे काय? फिटनेसप्रेमींमधील नव्या ट्रेंडचा धुमाकूळ, वाचा फायदे)
8. दही इसबगोल एकत्रित खाण्याचे फायदे (Dahi Isabgol Benefits)

  • दही आणि इसबगोल एकत्रित खाणे पचनप्रक्रियेसाठी रामबाण उपाय मानला जातो. 
  • बद्धकोष्ठता: इसबगोल हे एक सोल्युबल फायबर आहे, ज्यामुळे शौचाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. दह्यातील प्रोबायोटिक्समुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या मुळासकट दूर होण्यास मदत मिळते. 
  • जुलाबपासून सुटका: दही आणि इसबगोल एकत्रित खाल्ल्यास जुलाब होण्याची समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते. दह्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते.  
  • कोलेस्टेरॉल : इसबगोलमधील फायबर रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. 
  • वेटलॉस : या मिश्रणामुळे पोट भरलेले राहते परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळते. 
  • वाटीभर दह्यामध्ये एक ते दोन चमचे इसबगोल मिक्स करुन खाऊ शकता. इसबगोल जास्त वेळ दह्यामध्ये भिजत ठेवू नये.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com