Chana Benefits: भिजवलेले चणे खाल्ल्यास वजन वाढते की घटते? 1 दिवसात किती प्रमाणात करावे सेवन? वाचा माहिती

Chana Benefits: चण्यामध्ये प्रोटीन, फायबर, फॉस्फर, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक, कॉपर, व्हिटॅमिन बी3 यासारख्या कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. तसेच अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म देखील आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Chana Benefits: एक दिवसात किती प्रमाणात चणे खावे"
Canva

Chana Benefits: डाएटमध्ये शिजवलेल्या कडधान्यांचा समावेश करण्याचा सल्ला तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्यांकडून अनेकदा ऐकला असेल. विशेषतः भिजवलेले चणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. चण्यांचे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन केलं तर कित्येक आजारांपासून शरीराचे संरक्षण होईल. चण्यामध्ये प्रोटीन, फायबर, फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक, कॉपर, व्हिटॅमिन बी3 यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. चणे खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया माहिती...

भिजवेलेल चणे खाल्ल्यास वजन वाढते की वजन कमी होते?

भिजवलेल्या चण्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहण्यास मदत मिळते. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

पचनप्रक्रिया

पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करत असाल तर डाएटमध्ये चण्यांचा समावेश नक्की करावा. चण्यातील फायबर तत्त्वांमुळे पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत मिळते आणि पोटातील विषारी घटक देखील बाहेर फेकले जातात. याव्यतिरिक्त बद्धकोष्ठतेच्या समस्येतूनही सुटका मिळते.

निरोगी हृदय

चण्यातील अँटी-ऑक्सिडंट्स, अँथोसायनिन आणि फायटोन्युट्रिएंट्स तत्त्वांमुळे रक्तपेशी मजबूत होण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि आजारांचा धोकाही कमी होते. याव्यतिरिक्त शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठीही चणे खाणे लाभदायक मानले जाते.

Advertisement

(नक्की वाचा: Stomach Cleaning Tips: गरम पाण्यात मिक्स करा ही 1 गोष्ट, आतड्यांमधील सर्व घाण एकाच दिवशी पटकन येईल बाहेर)

अ‍ॅनिमिया

ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, त्या लोकांनी चण्याचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकते. चण्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते. अ‍ॅनिमिया यासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

Advertisement

(नक्की वाचा: Nasya Therapy: नाकामध्ये तेल सोडल्यास काय होतं? नस्य थेरपी कशी करावी आणि सर्वात चांगलं तेल कोणतं ठरेल?)

एका दिवसात किती चणे खावे?
  • नियमित 30 ते 50 ग्रॅम काळ्या रंगाचे चणे भिजवून खाणे फायदेशीर ठरेल.
  • एका निरोगी व्यक्तीच्या आरोग्यानुसार चण्यांचे इतके प्रमाण पुरेसे आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)