जाहिरात

Stomach Cleaning Tips: गरम पाण्यात मिक्स करा ही 1 गोष्ट, आतड्यांमधील सर्व घाण एकाच दिवशी पटकन येईल बाहेर

Stomach Cleaning Tips: अन्न पचवणे इतकंच पचनसंस्थेचे कार्य नाहीय तर खाल्लेल्या अन्नातील पोषणतत्त्व शोषून घेणे हे देखील महत्त्वाचं काम आहे. पण पोट स्वच्छ होत नसेल तर या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात.

Stomach Cleaning Tips: गरम पाण्यात मिक्स करा ही 1 गोष्ट, आतड्यांमधील सर्व घाण एकाच दिवशी पटकन येईल बाहेर
"Stomach Cleaning Tips: पोट स्वच्छ करण्यासाठी एरंडेल तेलाचा कसा करावा वापर?"
Canva
  • चुकीच्या जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो
  • पोटाचे आरोग्य निरोगी असेल तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो
  • पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी डाएटमध्ये एरंडेल तेलाचा समावेश करावा
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Stomach Cleaning Tips: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अयोग्य जीवनशैली यामुळे पोटाशी संबंधित कित्येक समस्या निर्माण होतात. पोट स्वच्छ होत नसल्याने काही लोकांना पचनप्रक्रियेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहण्यासाठी पचनप्रक्रियाही निरोगी असणं आवश्यक आहे. पण हिवाळ्यामध्ये लोक कमी प्रमाणात पाणी पितात, यामुळे पोटाशी संबंधित समस्या वाढतात. आतड्या पूर्णपणे स्वच्छ होत नसल्याने हळूहळू कित्येक आजारांचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त पोट फुगणे, भूक न लागणे, वारंवार थकवा जाणवणं यासारख्या समस्याही उद्भवतात. सुरुवातीस लोक याकडे दुर्लक्ष करतात पण कालांतराने या समस्या गंभीर होऊ लागतात. तुम्ही देखील पोट स्वच्छ होत नसल्याने त्रस्त आहात का? तर डाएटमध्ये एरंडेल तेलाचा समावेश करा.

एरंडेल तेलाचे फायदे | Castor Oil Benefits  

आयुर्वेदानुसार, एरंडेल तेलामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत या तेलाचा डाएटमध्ये समावेश करावा. एरंडेल तेलाचे कसे करावे सेवन, जाणून घेऊया माहिती...

पचनप्रक्रिया निरोगी राहते

केवळ अन्नाचे पचन करणं इतकंच पचनप्रक्रियेचे कार्य नसते तर खाल्लेल्या अन्नाद्वारे पोषणतत्त्व शोषून घेणे हे देखील महत्त्वाचे असते. एरंडेल तेलाच्या उपायामुळे पोटातील पाचक रसांचे कार्य सुधारते. यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. एरंडेल तेलाचा योग्य प्रमाणात डाएटमध्ये समावेश केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील. शरीर डिटॉक्स झाल्यास तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि त्वचेवरही नैसर्गिक तेज येईल.

Ghee Benefits: रोज कोमट पाण्यात 1 चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास काय होतं? न्युट्रिशनिस्टने सांगितले 5 फायदे

(नक्की वाचा: Ghee Benefits: रोज कोमट पाण्यात 1 चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास काय होतं? न्युट्रिशनिस्टने सांगितले 5 फायदे)

एरंडेल तेलाचा कसा करावा वापर?

  • एरंडेल तेलामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
  • एरंडेल तेलामुळे आतड्यांची स्वच्छता होण्यास मदत मिळेल आणि पचनप्रक्रिया देखील मजबूत होईल.
  • सकाळी उठल्यानंतर गरम पाणी किंवा दुधामध्ये एरंडेल तेल मिक्स करा आणि प्या.
  • जास्त प्रमाणात एरंडेल तेलाचे सेवन करू नका अन्यथा पोटाशी संबंधित समस्या वाढतील.
  • रात्रीच्या वेळेस एरंडेल तेलाचे सेवन करू नका, अन्यथा वारंवार टॉयलेटमध्ये जावे लागले.
  • आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून दोनदाचा एरंडेल तेलाचे सेवन करावे.

Banana Benefits: केळ खाण्याची योग्य वेळ कोणती? केळी खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील? केळ कधी खाऊ नये

(नक्की वाचा: Banana Benefits: केळ खाण्याची योग्य वेळ कोणती? केळी खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील? केळ कधी खाऊ नये)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com