Water Expiery Date: निरोगी आरोग्य जगण्यासाठी पाणी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच डॉक्टर पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहतेच शिवाय त्वचेसह संपूर्ण आरोग्यावरही याचा सकारात्मक परिणाम होतो. शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डिहायड्रेशनपासून ते थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणून पाण्याला जीवनही म्हणतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का पाण्याचीही एक्सपायरी डेट असते? किती दिवस साठवलेले पाणी पिणे योग्य ठरू शकते? जाणून घेऊया योग्य माहिती...
पाण्याचीही एक्सपायरी डेट असते का?
पाणी पूर्णपणे शुद्ध असेल तर ते खराब होत नाही. कारण शुद्ध पाण्यामध्ये बॅक्टेरिया, खनिजे आणि घाण आढळत नाही. अस्वच्छ भांडे किंवा अन्य हानिकारक गोष्टींच्या संपर्कात येईपर्यंत पाणी अशुद्ध होत नाही. तसेच पाणी कोणत्या ठिकाणी साठवून ठेवलंय? यावरुन पाण्याची गुणवत्ता ठरवली जाते.
साठवलेले पाणी कधीपर्यंत शरीरासाठी योग्य ठरू शकते?
बाटलीबंद पाणी
बाटलीबंद पाण्याची एक्सपायरी डेट सामान्यतः अंदाजे 1-2 वर्षे इतकी असते. यानुसार पाण्याच्या गुणवत्तेपेक्षा बाटलीची गुणवत्ता अधिक अवलंबून असते. कारण ठराविक वेळेनंतर प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये केमिकल तयार होऊ लागते, ज्यामुळे पाणी अशुद्ध आणि विषारी होते. तसेच उष्ण ठिकाणी किंवा सूर्यप्रकाशात बाटल्या स्टोअर करुन ठेवल्यासही पाण्याची गुणवत्ता ढासळते.
बाटलीबंद पाणी कधी पिणे योग्य ठरते?
बाटलीबंद पाणी तुम्ही थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवले असेल तर त्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी सुरक्षित ठरू शकते. पण पाण्याची चव वेगळीच लागत असल्यास ते पिणे टाळावे. शक्यतो प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी पिऊच नये.
कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी
विकत घेतलेली पाण्याची बाटली तुम्ही दोन ते तीन दिवसांमध्ये वापरू शकता.
(नक्की वाचा: Home Remedies For Gas: पोटातील गॅस किरकोळ आजार नाही, शरीराच्या आत तयार होईल मोठा धोका)
पाणी साठवताना या गोष्टी लक्षात ठेवा
- स्वच्छ भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवा.
- उष्ण ठिकाण आणि सूर्यप्रकाशापासून पाणी दूर ठेवावे.
- थंड आणि कोरड्या ठिकाणी पाणी साठवून ठेवा.
- साठवून ठेवलेले पाणी तपासत राहा. गंध आणि रंग बदलल्यास पाणी पिऊ नये.
- पाणी उकळून साठवून ठेवावे, यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतील.
(नक्की वाचा: Best Time To Eat Fruits: फळं खाण्याची सर्वात चांगली वेळ कोणती? न्युट्रिशनिस्टने सांगितली महत्त्वाची माहिती)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)