जाहिरात

Best Time To Eat Fruits: फळं खाण्याची सर्वात चांगली वेळ कोणती? न्युट्रिशनिस्टने सांगितली महत्त्वाची माहिती

Best Time To Eat Fruits: कोणत्या वेळेस फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल, याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती न्युट्रिशनिस्टने दिलीय.

Best Time To Eat Fruits: फळं खाण्याची सर्वात चांगली वेळ कोणती? न्युट्रिशनिस्टने सांगितली महत्त्वाची माहिती
"Best Time To Eat Fruits: कोणत्या वेळेस फळं खावी"

Best Time To Eat Fruits: निरोगी आरोग्य आणि पौष्टिक डाएटचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे फळं. फळांमध्ये व्हिटॅमिन, खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. फळांचे योग्य प्रमाणात सेवन केलं तर आरोग्यास अगणित लाभ मिळतील. पण चुकीच्या वेळेस फळं खाणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. फळांचे सेवन कधी करावे आणि कधी करू नये, याबाबत न्युट्रिशनिस्टनी सांगितलेली महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया...

फळांचे सेवन कधी करावे?

  • न्युट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल यांनी फळांबाबत माहिती देणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 
  • फळांचे सेवन दिवसातून दोनदा करावे, विशेषतः जेवणाच्या मधल्या वेळेमध्ये फळं खाल्ल्यास आरोग्यास सर्वाधिक लाभ मिळतील, अशी माहिती अग्रवाल यांनी व्हिडीओमध्ये दिलीय. 
  • कारण यावेळेस पोट हलके असते आणि फळांमधील पोषणतत्त्व शोषून घेण्यास शरीरास मदत मिळते. 
  • व्यायाम करण्यापूर्वी 30-40 मिनिटे आधीही फळं खाऊ शकता. 
  • वर्कआऊटपूर्वी फळे खाल्ल्यास शरीरास ऊर्जा मिळेल आणि व्यायामादरम्यान येणारा थकवा दूर होईल. 
  • हंगामी फळांचे सेवन करावे. 
  • काही गोड खाण्याची इच्छा होत असल्यास मिठाईऐवजी डाएटमध्ये फळांचा समावेश करावा. 

Ginger Benefits: सलग 7 दिवस आले खाल्ल्यास काय होईल? डॉक्टरांनी स्टेप बाय स्टेप सांगितली माहिती

(नक्की वाचा: Ginger Benefits: सलग 7 दिवस आले खाल्ल्यास काय होईल? डॉक्टरांनी स्टेप बाय स्टेप सांगितली माहिती)

फळं कधी खाऊ नये?

  • काही लोक सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी फळांचं सेवन करतात, पण न्युट्रिशनिस्टच्या मते ही सवय आरोग्यास हानिकारक ठरू शकते. 
  • रिकाम्या पोटी फळं खाण्याच्या सवयीमुळे शरीरातील रक्तशर्करा आणि इन्सुलिनची पातळी वाढू शकते. 
  • रिकाम्या पोटी फळं खाल्ल्यास आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलनही बिघडू शकते. 
  • रात्री उशीरा जेवल्यानंतरही फळं खाणे योग्य ठरणार नाही. यामुळे पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
  • फळांमधील पोषणतत्त्व मिळवण्यासाठी योग्य वेळेत फळं खाणे गरजेचे आहे. 
  • रिकाम्या पोटी फळं न खाता नाश्त्यामध्येही फळांचा समावेश करू शकता.     

Walnuts Benefits: भिजवलेले अक्रोड खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? डॉक्टर म्हणाले सकाळी नव्हे ही आहे बेस्ट वेळ

(नक्की वाचा: Walnuts Benefits: भिजवलेले अक्रोड खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? डॉक्टर म्हणाले सकाळी नव्हे ही आहे बेस्ट वेळ)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com