Relationship Tips In Marathi : लग्नानंतरचे आयुष्य नेहमीच सोपं नसतं. संसार प्रपंचाचा गाडा हाकताना अनेकदा संयम, समजूतदारपणा, संयम आणि परस्परांसोबत संवाद ठेवण्याची गरज असते. म्हणजे पती-पत्नी दोघांमध्येही नात्यात दुरावा निर्माण होत नाही. पण रोजच्या जबाबदाऱ्या आणि ताण-तणावामुळे कधी‑कधी नातं तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर अशा वेळी काही सोपे उपाय फॉलो केल्यास नातं पुन्हा मजबूत करता येतं.
नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी ‘2‑2‑2 नियम' खूप उपयोगी ठरतो. हा एक सोप्या पद्धतीचा नियम आहे,जो नवरा‑बायकोला पुन्हा एकमेकांच्या जवळ आणण्यास मदत करतो. या नियमाच्या मदतीने आपण आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवू शकता आणि सोबत नवीन,सुंदर आठवणी निर्माण करू शकता.
काय आहे 2-2-2 नियम? (What is the 2-2-2 rule)
2‑2‑2 नियम हा तीन सोप्या गोष्टींवर आधारित आहे. दर 2 आठवड्यांनी,2 महिन्यांनी आणि 2वर्षांनी एकत्र वेळ घालवण्याचा प्लॅन बनवणे.
ही पद्धत जोडप्यांना एकमेकांसोबत अधिक गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्यास मदत करते आणि नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा उत्तम मार्ग मानली जाते.
पहिला नियम
आठवड्यात एकदा डेट नाईट - याचा पहिला नियम असा आहे की, प्रत्येक दोन आठवड्यात एकदा डेट नाईट. ही वेळ फक्त पती-पत्नीसाठी असते. यामध्ये मोबाईल, काम आणि जबाबदाऱ्यांपासून दूर राहून ऐकमेकांसोबत राहण्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं. तुम्ही एकत्र डिनरला जाऊ शकता. ऐकमेकांसोबत चित्रपट पाहू शकता.
नक्की वाचा >> Chandra Shani Yog 2026: उद्या चंद्र-शनी ग्रहयोग! या 3 राशीच्या लोकांनी आताच व्हा सावध, काय-काय नुकसान होणार?
दुसरा नियम
2 महिन्यात एक वीकेंड ट्रिप - दुसरा नियम असा आहे की, दोन महिन्यात एक छोटीसी वीकेंड ट्रिप. खूप महागडा आणि लांबचा प्रवास करण्याची आवश्यकता नाही. जवळच्या एखाद्या शांत ठिकाणी तुम्ही मनमोकळेपणाने गप्पा मारू शकता. त्यामुळे तुमचं नातं मजबूत होऊ शकतं.
तिसरा नियम
2-2-2 तिसरा नियम असा आहे की, दोन वर्षात सुट्टीचा आनंद घ्या. सुट्टी किमान एक आठवड्याची असली पाहिजे. ही ती वेळ असते, जेव्हा पती पत्नी ऐकमेकांसोबत प्रेमाच्या गप्पा मारू शकतात. ते दोघेही त्यांच्या भविष्याच्या योजना आखू शकतात. यामुळे नात्याला एक नवी ऊर्जा मिळते.
नक्की वाचा >> Pune News: हापूस आंब्याच्या पेटीचा दर फुटला, किंमत ऐकून थंडीतही फुटेल घाम
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world