Moringa Benefits: मोरिंग्याची पानं संत्र्यापेक्षा 7पट, पालकपेक्षा 25पट आहेत शक्तिशाली; वाचा सेवनाची पद्धत

Moringa Leaves Benefits: आरोग्यासाठी मोरिंग्याच्या पानांचे सेवन करणं वरदान ठरेल.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Moringa Leaves Benefits: मोरिंगा खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ"
Canva

Moringa Leaves Benefits: शेवग्याच्या शेंगांचं सेवन करणं आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरते. बहुतांश लोक डाएटमध्ये शेवग्याच्या शेंगांचाच समावेश करतात, पण याची पाने देखील खाणे आरोग्यवर्धक ठरू शकते. शेवग्याच्या शेंगा 'मोरिंगा' या नावाने ओळखल्या जातात. मोरिंग्याची पाने खाण्याची योग्य पद्धत, फायदे जाणून घेऊया... 

मोरिंग्याची पानं खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत| Moringa Leaves Benefits: When And How To Eat | Moringa Pane Khanyachi Yogya Padhat

  • मोरिंग्याची पानांमध्ये संत्र्यांपेक्षा सातपट व्हिटॅमिन सी असते. 
  • दुधापेक्षा 17 पट अधिक कॅल्शिअम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 
  • केळ्यामध्ये 15 पट अधिक पोटॅशिअम आणि पालकपेक्षा 25 पट अधिक लोहाचे प्रमाण असते. 

मोरिंगा खाण्याचे 10 फायदे 

  • मोरिंग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. सर्दी-खोकला यासारख्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते. 
  • मोरिंग्याच्या पानांमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित राहते, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 
  • मोरिंग्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे शरीराच्या आतील भागातील सूज किंवा वेदना कमी होण्यास मदत मिळते. 
  • कॅल्शिअम आणि फॉस्फरस गुणधर्मांमुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळेल. 
  • मोरिंग्याच्या पानांतील क्लोरोजेनिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील फॅट्स पटकन बर्न होतात तसेच फायबरमुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. 
  • व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ईमुळे त्वचा सुंदर होण्यास मदत मिळते. केसगळतीची समस्या दूर होऊन केसांची चांगली वाढ होते. 
  • मोरिंग्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट स्वच्छ राहण्यास आणि पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. 
  • शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी मोरिंग्याच्या पानांचे सेवन करणं फायदेशीर ठरेल. 
  • खराब कोलेस्टेरॉलची समस्या आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहावी, यासाठी पानांचे सेवन करू शकता. 
  • पानांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा साठा असल्याने दिवसभरातील थकवा दूर होण्यास मदत मिळते. 

मोरिंग्याची पानं खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत

मोरिंग्याच्या पानांचं कधी करावं सेवन

  • सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मोरिंग्याच्या पानांचा ज्युस किंवा पानांची पावडर कोमट पाण्यामध्ये मिक्स करा. कारण पोट रिकामं असेल तर शरीर योग्य पद्धतीने पोषणतत्त्व शोषून घेऊ शकते आणि संपूर्ण दिवस शरीरातील ऊर्जा टिकून राहते. 
  • सकाळच्या वेळेस शक्य होत नसेल तर दुपारी जेवणांनतर 30-45 मिनिटांनंतरही मोरिंग्याच्या पानांचं सेवन करू शकता, यामुळे बद्धकोष्ठता आणि रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. 
  • संध्याकाळ किंवा रात्रीच्या वेळेस मोरिंग्याच्या पानांचे सेवन करणं टाळा, कारण झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतात. 

मोरिंग्याची पानं खाण्याची योग्य पद्धत  (The Right Way to Eat Moringa Leaves)

मोरिंग्याच्या पानांची पावडर 

एक ते दोन छोटे चमचे मोरिंग्याची पावडर दही, ताक किंवा सकाळच्या स्मूदीमध्ये मिक्स करून पिऊ शकता. सर्वात सोपी पद्धत म्हणजे कोमट पाण्यामध्ये मोरिंगा पावडर मिक्स करा.

मोरिंग्याची ताजी पाने  

मोरिंग्याची मूठभर पाने घेऊन त्याची भाजी तयार करू शकता. 

(नक्की वाचा: Winter Health Tips: हिवाळ्यात 30 दिवस रिकाम्या पोटी गाजर, बीट आवळ्याचा ज्युस प्यायल्यास कोणते आजार ठीक होतील?)

मोरिंग्याच्या पावडरचा चहा  

अर्धा चमचा मोरिंगा पावडर गरम पाण्यामध्ये उकळा, मध मिक्स करून मोरिंगा चहा तयार करू शकता. 

Advertisement

(नक्की वाचा:  Jaggery Benefits: शुद्ध गूळ कसा ओळखावा? MasterChefने सांगितलं हिवाळ्यात गूळ खरेदी करताना 3 गोष्टींची काळजी घ्या)

मोरिंग्याच्या पानांचं सेवन कोणी करू नये?
  • गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविना मोरिंग्याच्या पानांचे सेवन करू नये, संशोधनातील माहितीनुसार गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो. 
  • मधुमेह किंवा बीपीचे औषधोपचार सुरू असतील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  
  • थायरॉइडची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)