Digestive Tips: सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होत नाही? डॉक्टर हंसा योगेंद्र यांच्या 5 टिप्स करा फॉलो

Digestive Tips: कळत-नकळत आपण अशा काही पदार्थांचे सेवन करतो ज्यामुळे पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम होतात आणि पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होत नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Health News: पोट स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा 5 टिप्स"
Canva

Digestive Tips: सकाळची सुरुवात कशी होते, यावर प्रत्येकाचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळची सुरुवात अतिशय सकारात्मक आणि चांगली व्हावी, अशी इच्छा असेल तर ठराविक गोष्टी फॉलो करणं आवश्यक आहे. पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम झाल्यास पोटाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो, यामुळे सकाळी पोट पूर्णपणे स्वच्छ होत नाही आणि याचा त्रास दिवसभर सहन करावा लागतो. डॉक्टर हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे मॉर्निंग रुटीनसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती शेअर केलीय, जाणून घेऊया सविस्तर...

1. सूर्योदयापूर्वी उठावे

सकाळची सुरुवात चांगली व्हावी, यासाठी सूर्योदयापूर्वी उठावे. आयुर्वेदामध्ये या वेळेस ब्रह्म मुहूर्त असे म्हणतात. सूर्योदयापूर्वी उठणं शक्य नसेल तर किमान सकाळी 7 वाजता उठावे. सकाळी उशीरापर्यंत झोपून राहिल्यास आळस येईल आणि याचा पचनप्रक्रियेवरही परिणाम होईल. 

2. गरम पाणी प्या आणि शरीराची हलकीशी हालचाल करा

सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यानंतर दोन ते तीन वेळा रुममध्ये फेऱ्या माराव्या. बद्धकोष्ठतेचा सामना करणाऱ्यांनी हा उपाय नक्की करावा. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळेल.  

3. चहा आणि कॉफी पिणे टाळावे 

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणे टाळावे, यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. चहा पिण्यापूर्वी पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्यावर भर द्यावा.   

Advertisement

4. फळं आणि सुकामेवा  

अन्नाचे पचन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी सकाळी नाश्त्यामध्ये फळं आणि सुकामेव्याचा समावेश करावा. सकाळीच्या वेळेस शरीराला अशा पदार्थांची आवश्यकता ज्यांचे पचन सहजरित्या होईल आणि शरीराला ऊर्जा मिळेल. यानुसार केळी, सफरचंद, पपई, बदाम, अक्रोड अशा गोष्टींचं सेवन करणं फायदेशीर ठरेल. 

Advertisement

(नक्की वाचा: Morning Tips: सकाळी उठल्यानंतर 20-20-20 नियम फॉलो करा, मेंदूला मिळतील इतके मोठे फायदे)

5. योगासने 

पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी नियमित काही आसनांचा सराव करणं आवश्यक मानले जाते. योगासनांच्या सरावामुळे अ‍ॅसिडिटी दूर होण्यास मदत मिळेल आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील. सकाळी उठल्यानंतर मार्जरासन, पवनमुक्तासन, अर्ध मत्स्येन्द्रासनाचा सराव करू शकता. यामुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. 

Advertisement

(नक्की वाचा: Betel Leaves Benefits: 5 रुपयांचे हिरवेगार पान तुमच्यासाठी अमृतासमान ठरेल, वर्षानुवर्षे शरीर राहील तरुण)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)