Betel Leaves Benefits: भारतामध्ये विड्याच्या पानाचा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. माउथफ्रेशनरपासून आरोग्य आणि धार्मिक कार्याच्या दृष्टीनंही विड्याचे पान महत्त्वाचे मानले जाते. हिरवेगार आणि सुगंधित असे हे पान आरोग्यासाठीही लाभदायक आहे. या छोट्याशा पानामध्ये आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झाजर यांनी विड्याचे पान खाण्याचे सांगितलेले फायदे जाणून घेऊया...
विड्याचे पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे
डॉ. बिमल झाजर यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळात पान खाण्याचे महत्त्व केवळ परंपरेपुरतेच नव्हते तर त्यामागे वैद्यकीय कारणेही होती. विड्याच्या पानाचे तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केले तर आरोग्यास असंख्य फायदे मिळतील.
पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायक
पूर्वीच्या काळी लोक जेवणानंतर पान (Betel Leaves Benefits) खात असत, कारण यातील नैसर्गिक तत्त्वांमुळे पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. अन्नाचे पचन सहजरित्या होते, पोट फुगणे, अॅसिडिटी आणि गॅस यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
श्वसनाशी संबंधित समस्या
बदलत्या हवामानानुसार आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवणे सामान्य बाब आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही डाएटमध्ये विड्याच्या पानाचा समावेश करू शकता. विड्याच्या पानातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे श्वसनमार्गातील सूज कमी होण्यास मदत मिळते. पाने गरम पाण्यात उकळून त्याची वाफ घेतल्यास कफ कमी होऊन श्वसनमार्गातील अडथळे दूर होतील.
(नक्की वाचा: Betel Leaf Benefits: विड्याचे पान चावून खाण्याचे फायदे)
मूड चांगला होईल
थकवा, चिडचिड किंवा नैराश्य आल्यासारखे वाटत असेल तर विड्याचे पान (Betel Leaves Benefits) खाल्ल्यास मेंदूला शांतता मिळेल आणि ताजेतवाने वाटेल. विड्याच्या पानातील काही नैसर्गिक रसायने मेंदूतील 'एसिटाइलकोलीन' नावाचा पदार्थ संतुलित ठेवण्याचे काम करतात, ज्यामुळे मूड सुधारतो.
तोंडाचे आरोग्य
पानातील पोषकघटक शरीरातील जंतूंचा खात्मा करण्याचे काम करतात. यामुळे तोंडाला येणारा दुर्गंध आणि हिरड्यांवरील सूज कमी होण्यास मदत मिळते. शिवाय यातील पोषणतत्त्व शरीराचे संसर्गापासूनही संरक्षण करतात.
विड्याचे पान कधी आणि कसे खावे?
विड्याच्या पानाचे (Betel Leaves Benefits) सेवन नैसर्गिक स्वरुपातच करावे. चुना, सुपारीचा वापर करणं टाळावे, कारण या गोष्टी शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. जेवणानंतर विड्याचे पान खाणे किंवा काढा पिणे आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world