Benefits Of Eating Almonds: बदाम किती तास पाण्यात भिजत ठेवावे, बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती?  

Benefits Of Eating Almonds: बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवून खाल्ल्यास शरीरास कोणकोणते लाभ मिळतील?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Benefits Of Eating Almonds: बदाम खाण्याची योग्य पद्धत माहितीये का?"
Canva

Benefits Of Eating Almonds: बदामाचे सेवन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, मॅग्नेशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे पचनसंस्था, हृदयाचे आरोग्य, मेंदूची कार्यप्रणाली, त्वचा, केस, वजन आणि रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. विशेषतः बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोषक घटकांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. बदाम किती तास पाण्यात भिजवून ठेवावे आणि बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती, हे तुम्हाला माहितीये का? 

बदाम पाण्यात किती तास भिजवून ठेवावे?

बदाम खाल्ल्यास संपूर्ण आरोग्यास फायदे मिळतील, पण बदाम कच्चे खाण्यापेक्षा ते पाण्यात भिजवून खाणे अधिक चांगले मानले जाते. भिजवलेल्या बदामामध्ये पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. बदाम किमान आठ तास पाण्यात भिजवून खाणे उत्तम ठरेल.  

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते 

बदामामध्ये असलेले हेल्दी फॅट्स, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळेल. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.  

रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहील 

रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यामध्ये बदाम महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण बदामाचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. तसेच मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते. संशोधनातील माहितीनुसार, मॅग्नेशियमयुक्त आहार इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते.

Advertisement
सर्दी-खोकल्यापासून बचाव

भिजवलेल्या बदामामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास पोषक असणाऱ्या घटकांचा समावेश आहे. ज्यामुळे सर्दी-खोकला यासारख्या आजाराविरोधात लढण्यास मदत मिळते. 

(नक्की वाचा: Sunlight Benefits: रोज 10 मिनिट उन्हात बसल्यास काय होईल? Doctor Hansa Yogendra यांनी सांगितले मोठे फायदे)

भूक नियंत्रण राहते 

नियमितपणे बदाम खाल्ल्यास भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. बदामामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते,ज्यामुळे मेंदूला पोट भरल्याचे संकेत देणारे हार्मोन्स सक्रिय होतात. 

Advertisement

(नक्की वाचा: Sleep Quality: चांगल्या झोपेसाठी डाएटमध्ये 1 गोष्ट खाण्यास करा सुरुवात, गाढ आणि चांगली झोप येईल)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)