Frequent Urination Causes: रात्री सतत लघवीला उठावं लागतंय, जाणून घ्या डॉक्टरांनी या समस्येवर सांगितलेला उपाय

Frequent Urination Causes: रात्रीच्या वेळेस वारंवार लघवी होण्याच्या समस्येमुळे तुम्ही देखील त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Frequent Urination Cause : वारंवार लघवी होण्यामागील कारणं आणि उपाय"
Canva

Frequent Urination Causes: रात्री वारंवार होणाऱ्या लघवीच्या समस्येमुळे तुमची देखील झोप मोडते का? दिवसभरही तुम्ही या समस्येचा सामना करता का? मूत्रमार्गाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी डॉ. सलीम जैदी यांनी सांगितलेले उपाय जाणून घेऊया...

वारंवार लघवी होण्यामागील कारणं

शरीरातील काही पोषणतत्त्वांची कमतरता किंवा दोषांमुळे वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवते, असे आपल्याला बऱ्याचदा वाटते. पण कधीकधी जीवनशैली देखील कारणीभूत असू शकते.

1. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी पिणे

दिवसभर सतत पाणी पित राहणे, वारंवार चहा-कॉफी, शितपेय पिणे यासारख्या गोष्टींमुळे मूत्राशयाशी संबंधित समस्या निर्माण होतात, ज्यामुळे वारंवार लघवी होते.

2. आजार 

मधुमेहाची समस्या असल्यास वारंवार लघवी होऊ शकते, अशा परिस्थितीत शरीर अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते, यामुळेही वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवते.

3. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)

मूत्रमार्गातील संसर्गामुळेही वारंवार लघवी होऊ शकते.

4. पुरुषांमध्ये वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथी देखील या समस्येचे कारण असू शकतात. यामुळेही मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही, ज्यामुळे वारंवार लघवी होते.

Advertisement

5. महिलांमध्ये ही समस्या प्रेग्नेंसीदरम्यान किंवा मेनोपॉज अथवा हार्मोनल बदलामुळेही निर्माण होऊ शकते. तसेच ओटीपोटातील स्नायू कमकुवत झाल्यासही वारंवार लघवी होते.

6. ताण आणि औषधांच्या सेवनामुळेही वारंवार लघवी होते. मानसिक ताण आणि चिंता विकारामुळेही मूत्राशयावर ताण येतो.

वारंवार लघवी होण्याच्या समस्येपासून सुटका कशी मिळवावी?

डॉक्टर जैदी यांनी सांगितलेले सोपे उपाय तुम्ही फॉलो करू शकता...

1. पाणीयुक्त खाद्यपदार्थांचे मर्यादित स्वरुपात सेवन करावे

आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळावे, तसेच रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी पाणी प्यावे.

2. चहा-कॉफी, कोल्ड ड्रिंक कमी प्यावे

कॅफीन आणि सोडा दोन्ही गोष्टींमुळे मूत्राशयावर ताण येतो, यामुळे अशा पदार्थांचं कमी प्रमाणात सेवन करावे.

वारंवार होणाऱ्या लघवीची समस्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय

धण्याचे पाणी

धण्याच्या पाण्यामुळे वारंवार होणारी लघवीची समस्या कमी होऊ शकते. धण्यातील औषधी गुणधर्मांमुळे मूत्राशय शांत होण्यास मदत मिळते तसेच मूत्राशयाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.

Advertisement

(नक्की वाचा: Moringa Benefits: मोरिंग्याची पानं संत्र्यापेक्षा 7 पट, दुधापेक्षा 17 पट, पालकपेक्षा 25 पट आहेत शक्तिशाली; जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत)

Advertisement
कसे तयार करावे धण्याचे पाणी?
  • एक चमचा धणे ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
  • सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून प्यावे.
  • हवे असल्यास हे पाणी तुम्ही उकळूनही पिऊ शकता.
  • नियमित हा उपाय तुम्ही करू शकता.

(नक्की वाचा: Beetroot Juice: बीट ज्युसमध्ये आलं मिक्स करुन प्यायल्यास काय होईल? किती दिवस ज्युस प्यावा?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)