जाहिरात

Beetroot Juice: बीट ज्युसमध्ये आलं मिक्स करुन प्यायल्यास काय होईल? किती दिवस ज्युस प्यावा?

Beetroot Juice Benefits: बीटमध्ये आल्याचा रस मिक्स करून प्यायल्यास कोणकोणत्या आजारांपासून संरक्षण मिळते, जाणून घ्या सविस्तर...

Beetroot Juice: बीट ज्युसमध्ये आलं मिक्स करुन प्यायल्यास काय होईल? किती दिवस ज्युस प्यावा?
"Beetroot Juice Benefits: आल्यासह बीट ज्युस पिण्याचे फायदे"
Canva

Beetroot Juice Mixed With Ginger: निरोगी जीवन जगण्यासाठी दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे, कारण शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला देखील थकवा जाणवतो का? तर बीट ज्युस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रिकाम्या पोटी बीट ज्युस प्यायल्यास शरीराला असंख्य फायदे मिळतील. एमडीपीआयतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, बीटमध्ये नायट्रेटचे प्रमाण चांगलं असते. पण बीट ज्युसमध्ये आले मिक्स करुन प्यायल्यास कित्येक आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत मिळेल.

आले आणि बीटमधील पोषणतत्त्व

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या संशोधनातील माहितीनुसार, मधुमेह, हृदयरोग आणि न्यूरोडिजनरेटिव्ह यासारख्या आजारांवरील उपचारांमध्ये आले प्रभावी ठरू शकते. बीट ज्युसमध्ये आले मिक्स करुन प्यायल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते, त्वचेचा रंग सुधारतो आणि पचनसंस्था मजबूत होते. बीटमधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, ज्यामुळे संसर्ग आणि रोगांपासून शरीराचे संरक्षण होते.

आल्यातील पोषणतत्त्व

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या संशोधनातील माहितीनुसार, आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॉपर आणि मॅग्नीज यासारख्या कित्येक व्हिटॅमिन तसेच खनिजांचा समावेश आहे. यातील जिंजरोल आणि शोगाओल यासारखे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स तसेच अँटी-इन्फ्लेमेटरी कम्पाउंड्सही आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

पचनप्रक्रिया मजबूत होते

बीटमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. याव्यतिरिक्त आल्यातील पाचकरसांमुळे पचनप्रक्रिया सुधारेल आणि पोटातील सूज कमी होण्यास मदत मिळते.

Moringa Benefits: मोरिंग्याची पानं संत्र्यापेक्षा 7 पट, दुधापेक्षा 17 पट, पालकपेक्षा 25 पट आहेत शक्तिशाली; जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत

(नक्की वाचा: Moringa Benefits: मोरिंग्याची पानं संत्र्यापेक्षा 7 पट, दुधापेक्षा 17 पट, पालकपेक्षा 25 पट आहेत शक्तिशाली; जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत)

वेटलॉससाठी प्रभावी

बीट ज्युसमध्ये आले मिक्स केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. या डिटॉक्स ड्रिंकमुळे वजन कमी होईल, म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील.

Eye Mucus Issue:  गंभीर! कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांमधून पिवळा किंवा पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो?

(नक्की वाचा: Eye Mucus Issue: गंभीर! कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांमधून पिवळा किंवा पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो?)

त्वचेसाठी लाभदायक

बीट आणि आल्यातील पोषणतत्त्व त्वचेसाठी लाभदायक असतात. अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने त्वचा चमकदार होते. चेहऱ्यावरील डाग की होण्यास मदत मिळेल आणि केसांचे आरोग्यही निरोगी राहील.

बीट ज्युस किती दिवस प्यावा?

बीट ज्युस सलग 10 ते 15 दिवस प्यावा. यानंतर काही दिवस ब्रेक घ्या आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा ज्युस प्यावा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com