Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला का होते? या गोष्टी खाल्ल्याने तुमच्या मूत्राशयावर येतोय ताण

Frequent Urination Causes: रात्रीच्या वेळेस वारंवार लघवी होणे म्हणजे कित्येक गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.

जाहिरात
Read Time: 5 mins
"Frequent Urination Causes: रात्रीच्या वेळेस वारंवार लघवी होण्यामागील गंभीर कारणं"
Canva

Frequent Urination Causes: वारंवार होणाऱ्या लघवीमुळे तुम्हाला देखील रात्री झोपेतून उठावे लागते का? यामुळे झोपेवर परिणाम होत आहेत का? या लेखाच्या माध्यमातून डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलेले उपायांमुळे कदाचित तुम्हाला मदत मिळू शकते. डॉक्टर जैदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही फळांच्या सेवनामुळे वारंवार लघवीची समस्या निर्माण होते तर ठराविक फळं खाल्ली तर ही समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. कोणत्या फळांचे सेवन करावे, कोणत्या वेळेस करावे, याबाबत डॉक्टरांनी दिलेली माहिती सविस्तर स्वरुपात जाणून घेऊया... 

रात्रीच्या वेळेस वारंवार लघवी होण्यामागील कारणं | Frequent Urination Causes At Night  

रात्रीच्या वेळेस वारंवार होणाऱ्या लघवीच्या समस्येस वैद्यकीय भाषेत नॉक्टुरिया (Nocturia) असे म्हणतात. काही लोकांच्या शरीरामध्ये रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात युरिन तयार होते, या समस्येस नॉक्टर्नल पॉलीयुरिया (Nocturnal Polyuria) असे म्हणतात. काही लोकांचे मूत्राशय ओव्हर अ‍ॅक्टिव्ह असते, त्यामुळे मूत्राशयामध्ये लघवी थोड्याशा प्रमाणातही जमा झाल्यास त्यांचे शरीर लघवी होणार असल्याचे संकेत देते. पुरुषांमध्ये ही समस्या आढळण्यामागील मोठे कारण म्हणजे बीपीपीएच म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, जी सामान्य समस्या आहे. मधुमेह, झोपण्याच्या वेळेस जास्त प्रमाणात द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करणे यासारख्या गोष्टीही कारणीभूत ठरू शकतात. पण या समस्येशी फळांचा संबंध कसा? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का, जाणून घेऊया याचे उत्तर... 

आम्लयुक्त फळे | Acidic Fruits

आम्लयुक्त फळांचे सेवन केल्यास मूत्राशयाला त्रास होतो आणि जळजळ वाढते, वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.  

गोड फळे

चवीला खूप गोड असणाऱ्या फळांचे सेवन केल्यास शरीरातील रक्तशर्करेची पातळी वाढू शकते. मधुमेहग्रस्तांमध्ये वारंवार होणाऱ्या लघवीच्या समस्येस ही गोष्ट कारणीभूत असू शकते. 

पाण्याचे प्रमाण जास्त असणारी फळे

रात्री झोपण्यापूर्वी पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या फळांचे सेवन केल्यास मूत्राशयामध्ये लघवीचे प्रमाण वाढते, यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच योग्य फळांप्रमाणे योग्य वेळेत फळं खाणंही तितकेच महत्त्वाचे आहे. 

Advertisement

फळं खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी 

योग्य फळांची निवड, फळे खाण्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाणात फळांचे सेवन केलं तर रात्रीच्या वेळेस वारंवार होणाऱ्या लघवीची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळू शकते. यामुळे झोपेवरही दुष्परिणाम होणार नाहीत. फळांची निवड करण्यापूर्वी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी.

अ‍ॅसिडचे प्रमाण कमी असणारी फळे

काही फळांमध्ये आम्लाचे प्रमाण कमी असते, अशा फळांचे सेवन करण्यावर भर द्यावा. 

फळांचे सेवन करण्याची वेळ

योग्य वेळेस फळांचे सेवन करणंही तितकेच महत्त्वाचे आहे. सकाळी, दुपारच्या वेळेस फळांचे सेवन करावे. संध्याकाळी तसेच रात्रीच्या वेळेस फळं खाणे टाळावे.  

Advertisement

फळांचे योग्य प्रमाण 

मर्यादित स्वरुपातच फळांचे सेवन करावे. फळांसोबत आणखी काय खाऊ शकतो, याबाबतही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जेणेकरुन रक्तशर्करेची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळेल.  

आरोग्याच्या हिशेबाने निर्णय घ्यावा

प्रत्येकाच्या शरीराची प्रकृती वेगवेगळी असते. म्हणूनच सात ते 10 दिवसांसाठी एका वहीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींची नोंद करुन ठेवावी. तुम्ही कोणते फळ खाल्ले, किती प्रमाणात खाल्ले, कोणत्या वेळेस फळ खाल्ले आणि रात्री लघवीसाठी किती वेळा उठावे लागले; या सर्व गोष्टींची नोंद करून ठेवावी. यामुळे तुम्हाला फळांच्या निवडीबाबत योग्य निर्णय घेणे सोपे जाईल.

Advertisement

कोणत्या फळांचे सेवन करावे? | Causes Of Frequent Urination

केळ

केळ्यामध्ये आम्लाचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. स्नायू आणि मज्जातंतूच्या कार्यप्रणालीसाठी आवश्यक असणारे पोटॅशिअम देखील केळ्यामध्ये आहे. केळी खाल्ल्यास मूत्राशयाला त्रास होणार नाही. नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या वेळेस एक केळ खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि मूत्राशयावर अतिरिक्त ताणही येणार नाही. पण तुम्ही मूत्रपिंडाशी संबंधित आजारापासून त्रस्त असाल तर शरीरामध्ये पोटॅशियमची पातळी वाढणे हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केळ्यांचे सेवन करावे. 

पिअर

पिअर फळामध्ये आम्लाचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे मूत्राशयावर दुष्परिणाम होत नाहीत तसेच वारंवार लघवी होण्याची समस्याही निर्माण होत नाही. या फळामध्ये फायबरचे जास्त प्रमाण असते, जे पचनप्रक्रियेस लाभदायक आहे. नाश्ता, दुपारच्या जेवणामध्ये या फळाचा तुम्ही समावेश करू शकता. केवळ हे फळ जास्त प्रमाणात पिकलं असेल तर खाणे टाळावे, कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे. 

(नक्की वाचा: Better Sleep Tips: झोपेतून उठून वारंवार टॉयलेटमध्ये जावं लागतं? झोपण्यापूर्वी करा 2 सोपी कामं, मिळेल गाढ झोप)

ब्ल्यु बेरीज

ब्ल्यु बेरीज थोडेसे महागडे फळ आहे, पण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या फळामध्ये पॉलिफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. या अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि साखरेची पातळी नियंत्रित येण्यास मदत मिळते. ब्ल्यु बेरीजमध्ये अ‍ॅसिडचे प्रमाणही कमी असते, ज्यामुळे हे फळ खाणे मूत्राशयासाठी फायदेशीर मानले जाते.   

पपई 

पपई खाणे मूत्राशयासाठी पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. यातील डायजेस्टिव्ह एंझाइम्समुळे पोट हलके राहण्यास मदत मिळते. दुपारच्या वेळेस या फळाचे सेवन करणं फायदेशीर ठरेल.

कलिंगड 

कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हे फळ दिवसा खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. संध्याकाळी तसेच रात्रीच्या वेळेस कलिंगड खाणे टाळावे, अन्यथा रात्रीच्या वेळेस वारंवार लघवीची समस्या निर्माण होऊ शकते.  

सफरचंद

सफरचंदाचे पचन सहजरित्या होते आणि मूत्राशयावरही ताण येत नाही. केवळ तुम्ही हे फळ किती प्रमाणात खाताय, हे जास्त महत्त्वाचे आहे. लहान ते मध्यम आकाराचे सफरचंद तुम्ही नियमित खाऊ शकता.  

कोणत्या फळांचे सेवन करू नये?

लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळे उदाहरणार्थ संत्री, द्राक्ष, लिंबू, टोमॅटो यासारख्या फळांचे सेवन करणं टाळावे.  कारण या फळांमध्ये अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते, यामुळे मूत्राशयाशी संबंधित समस्या निर्माण होतील आणि वारंवार लघवीची समस्या निर्माण होईल. 

क्रॅनबेरी ज्यूस

क्रॅनबेरी ज्यूस मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी खूप फायदेशीर मानला जातो, पण आम्लाचे प्रमाण जास्त असल्याने रात्रीच्या वेळेस वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवू शकते.

(नक्की वाचा: Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला उठावं लागतंय? झोपण्यापूर्वी दूध किंवा पाण्यात मिक्स करा या गोष्टी, मग पाहा कमाल)

पाण्याचे जास्त प्रमाण असणारी फळंसाखरयुक्त सुकामेवा 

खजूर किंवा मनुका यासारख्या सुकामेव्याचे सेवन करणं टाळा, कारण यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे मूत्राशयामध्ये लघवी जास्त प्रमाणात तयार होते. मधुमेहग्रस्तांना यामुळे अधिक त्रास होऊ शकतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)