
Frequent Urination Causes | Sarkhi Laghvi Honyachi Karane : तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागतं का? या समस्येमुळे रात्रीच्या झोपेवर आणि दिवसा काम करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या त्रासामुळे कित्येक लोक कंटाळलेले आहेत. वारंवार होणाऱ्या लघवीची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी डॉ. सलीम जैदी यांनी पाच उपाय सांगितले आहेत. तसंच सतत लघवी होण्यामागील कारणे काय असू शकतात? यावरील साधेसोपे उपाय कोणते याबाबतही सविस्तर माहिती जाणून घेऊया.
वारंवार लघवी का होते?
सर्वप्रथम वारंवार लघवी होण्यामागील कारणं काय असू शकतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नेमकी समस्या समजल्यानंतरच योग्य तो उपाय करणं सोपे ठरेल. कारण कधीकधी समस्या शारीरिक नव्हे तर अयोग्य जीवनशैलीमुळे निर्माण होते. उदाहरणार्थ खूप जास्त पाणी पिणे, चहा-कॉफी, शीतपेय जास्त पिणे, या सर्व सवयी मूत्राशयाकरिता त्रासदायक ठरतात. ज्यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते.
- काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय परिस्थिती देखील कारणीभूत असते.उदाहरणार्थ मधुमेह
- मूत्रमार्गातील संसर्गामुळे मूत्राशयात जळजळ तसेच वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवणे.
- विशेषतः पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींचे प्रमाण वाढल्यास ही समस्या उद्भवू शकते.
- गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीदरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांना वारंवार लघवीचा त्रास होऊ शकतो.
- कित्येकदा मूत्राशयाच्या कमकुवतपणामुळेही ही समस्या निर्माण होऊ शकते. तसेच ताण, चिंता, कमकुवत स्नायू किंवा विशिष्ट औषधांमुळे मूत्राशयाच्या नियंत्रणावर परिणाम होतो.
- पेन किलर्समुळे वारंवार लघवीची समस्या उद्भवू शकते.
वारंवार लघवी होण्याची समस्या कशी रोखावी?
डॉ. जैदी यांनी सांगितलेले काही सोपे उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता. यामुळे वारंवार लघवी होण्याच्या त्रासातून आराम मिळू शकतो.
(नक्की वाचा: Amla Benefits: वारंवार लघवी होते? आचार्य बालकृष्ण यांनी सांगितला उपाय)
पहिला उपाय
डाएटमधील द्रवपदार्थाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे. जास्त पाणी पिणे चांगले असते पण वारंवार लघवीची समस्या असेल तर द्रवपदार्थाचे सेवन कमी करावे. विशेषतः सूर्यास्तानंतर तसेच झोपण्यापूर्वी दोन ते तीन तासांपूर्वी जास्त पाणी पिऊ नये. एक कपच चहा प्यावा, तहान लागली तर मर्यादित स्वरुपातच पाणी प्यावे.
दुसरा उपाय
चहा, कॉफी आणि मद्यपान तसेच तिखट पदार्थांचे सेवन करणं टाळावे. तुमच्या या सवयींमुळे मूत्राशयावर ताण येतो आणि वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवते. चहा कॉफी पिणे आवडत असेल तर दिवसभरात दोन ते तीन कपच प्यावे. तसेच तिखट पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.
तिसरा उपाय
वाढत्या वयोमानानुसार मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होणे सामान्य आहे. या समस्येवर उपाय म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा.
(नक्की वाचा: Urine Problem Ayurvedic Remedy: लघवीला फेस येतोय? या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात)
हे उपाय केल्यानंतरही आराम मिळत नसेल तर खालील घरगुती उपाय करुन पाहा
धण्याचे पाणी- धण्यातील औषधी गुणधर्मामुळे मूत्राशयाला आराम मिळेल आणि मूत्रमार्ग संसर्गाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
- एक चमचा धणे रात्रभर ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे.
आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे मूत्राशय मजबूत होण्यासह मूत्रमार्गातील संसर्गही रोखण्यास मदत मिळू शकते.
- मधामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, ज्यामुळे संसर्ग दूर होण्यास मदत मिळेल.
- एक चमचा आवळा पावडर किंवा आवळ्याचा ताजा रस घ्यावा आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा.
- दिवसातून दोनदा या मिश्रणाचे सेवन करावे.
- नियमित हा उपाय केल्यास मूत्रमार्गाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा मजबूत होईल.
- डाळिंबाची साली सुकवून पावडर तयार करा.
- रोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा पावडर पाणी किंवा दुधासोबत प्यावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world