Hives Remedy: शरीरावर शीतपित्त आल्यास काय करावे? समस्येमागील ही आहेत मुख्य कारणं

Hives Remedy: आयुर्वेदिक डॉक्टर प्रताप चौहान यांनी सांगितले की, शरीरावर शीतपित्त आल्यास घाबरू नका याउलट त्यावर योग्य ते उपचार करा. ही समस्या का निर्माण होते, यामागील कारणे जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Hives Remedy: शीतपित्त येण्यामागील कारणे"

Hives (Urticaria) Remedy: शरीरावर येणारे लाल-लाल रंगाचे चट्टे, त्यामुळे खाज येणे, जळजळ होणे, चिडचिड होणे यामुळे कोणीही त्रस्त होऊ शकतो. सामान्य भाषेमध्ये यास शरीरावर पित्त येणे आणि वैद्यकीय भाषेत हाइव्स (Hives) असे म्हणतात. सर्व वयोगटातील लोकांमध्ये ही समस्या उद्भवू शकते. पण ऑफिसमध्ये असताना, प्रवास करताना किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान शरीरावर शीपित्त आल्यावर अवघडल्यासारखे वाटते.  शरीरावर लाल रंगाचे चट्टे येऊन खाज येणे त्रासदायक असते. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर तज्ज्ञांनी सांगितलेली महत्त्वाची माहिती नक्की जाणून घ्या. 

शीतपित्ताबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं?

जीवा आयुर्वेदाचे संचालक आणि प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. प्रताप चौहान यांनी NDTVशी संवाद साधताना म्हटलं की, शरीरावर पित्त आल्यास घाबरू नका, याउटल त्यावर औषधोपचार करा.  

शरीरावर शीतपित्त का येते? 

आयुर्वेदिक डॉ. प्रताप चौहान यांनी सांगितली खालील कारणे...

  • एखाद्या औषधामुळे, खाण्याच्या सवयीमुळे, धूळ, प्रदूषण, रसायनांची अ‍ॅलर्जी 
  • काही लोकांना हवामानाच्या बदलांमुळेही शरीरावर शीतपित्त येते 
  • पचनाशी संबंधित समस्या 
  • तणाव तसेच झोपेच्या कमतरतेमुळे शरीराचे संतुलन बिघडते, यामुळेही शीतपित्ताचा त्रास होऊ शकते.   

(नक्की वाचा: Collagen Deficiency Issue: कोलेजनच्या कमतरतेमुळे बिघडतेय तुमचे सौंदर्य, खा या गोष्टी 15 दिवसांत दिसाल तरुण)

शीतपित्तावर कोणते उपाय करावे?

  • डॉ. प्रताप चौहान यांनी सांगितले की, सर्वप्रथम त्वचा नखांनी खाजवणे थांबवावे, अन्यथा चट्टे अधिक वाढतील आणि त्वचेची जळजळ होईल.  
  • थंड पाण्यात कापड बुडवून ते त्वचेवर ठेवावे. 
  • कडुलिंबाची पाने किंवा तुळशीची पाने वाटून त्वचेवर लावा. यामुळे खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत मिळेल.  
  • सर्वप्रथम डाएटची विशेष काळजी घ्यावी. 
  • पचनास हलक्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. उदाहरणार्थ: दलिया, खिचडी, फळे      
  • नारळपाणी, काकडी यासारख्या थंड प्रकृतीच्या फळ-भाज्यांचा डाएटमध्ये समावेश करावा. 

(नक्की वाचा: Beauty Tips News: चाळीशीमध्ये दिसाल पंचविशीसारख्या, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा हा पिवळा चिकट पदार्थ)

डॉक्टरांशी संपर्क कधी साधावा?

डॉ. प्रताप चौहान यांच्यामते, शीतपित्त वारंवार शरीरावर येत असेल आणि श्वसनाशी संबंधित समस्या, चेहऱ्यावर सूज येणे किंवा भोवळे येणे यासारखा त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांना संपर्क साधावा. एखाद्या गंभीर अ‍ॅलर्जीचे हे संकेत असू शकतात. शीतपित्ताच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. शरीराच्या आतील भागामध्ये काही गोष्टी असंतुलित असल्याचे हे संकेत आहेत. योग्य डाएट आणि लाइफस्टाइल फॉलो केल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article