जाहिरात

Beauty Tips News: चाळीशीमध्ये दिसाल पंचविशीसारख्या, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा हा पिवळा चिकट पदार्थ

Beauty Tips News: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर पिवळा चिकट पदार्थ लावल्यास त्वचा हायड्रेट राहण्यास आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळेल. चेहऱ्यावरील डाग देखील दूर होण्यास मदत मिळेल.

Beauty Tips News: चाळीशीमध्ये दिसाल पंचविशीसारख्या, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा हा पिवळा चिकट पदार्थ
"Beauty Tips News: चेहऱ्यावर पिवळा पदार्थ लावल्यास त्वचेवर येईल नॅचरल ग्लो"

Beauty Tips News: आपल्या देशामध्ये स्वयंपाकासाठी तूप वापरण्याची परंपरा फार जुनी आहे. आयुर्वेदिक औषधोपचारांमध्येही तुपाचा समावेश केला जातो. तूप हे आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना मानले जाते. आयुर्वेदामध्ये तुपास अमृत म्हटले जाते. योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि शरीराची ऊर्जा देखील वाढते. तर दुसरीकडे तूप त्वचेवर लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते, असेही म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर तूप लावले तर यातील पोषणतत्त्व त्वचेसाठी जादुई औषधाप्रमाणे काम करतील.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Pexels

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मिळेल सुटका ।  Ghee Benefits For Glowing Skin In Marathi

कोरड्या तसेच निर्जीव त्वचेच्या समस्येचा सामना करत असाल तर ब्युटी रुटीनमध्ये तुपाचा समावेश करावा. त्वचेसाठी तूप वरदान ठरेल. यातील फॅटी अ‍ॅसिडमुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपातील मॉइश्चरायझर मिळेल. 

(नक्की वाचा: Ghee Warm Water: तूप मिक्स करुन गरम पाणी पिण्याचे फायदे)

Latest and Breaking News on NDTV

चेहऱ्यावर येईल नैसर्गिक तेज। Skin Care Tips In Marathi

तुपातील व्हिटॅमिन्स आणि पोषकघटकांमुळे त्वचेला आतील बाजूने पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. यामुळे चेहऱ्याची त्वचा हायड्रेट राहील तसेच त्वचेवर नैसर्गिक तेज देखील येईल. 

सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतील । Why You Should Apply Ghee Before Sleeping

तुपामधील व्हिटॅमिन A, D आणि E मुळे त्वचा तरुण राहण्यास मदत मिळते. यामुळे शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढण्यास मदत मिळू शकते. परिणामी त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळू शकते.  

(नक्की वाचा: Ghee Jaggery Benefits: तूप लावलेल्या पोळीसोबत गूळ खाण्याचे फायदे)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळेल। Natural Moisturizer Tips

पिगमेंटेशन किंवा चेहऱ्यावरील डागांपासून सुटका हवी असल्यास रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर तूप लावा. यामुळे त्वचा सुंदर आणि नितळ होण्यास मदत मिळेल. 

डार्क सर्कल्सच्या समस्येतून मिळेल सुटका । Home Remedies For Dark Circle

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून सुटका हवी असल्यास तूप लावून हलक्या स्वरुपात मसाज करावा. यामुळे डोळ्याच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत सुरू होईल आणि त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. 

(नक्की वाचा: Ghee Milk Benefits: रात्री दुधात तूप मिक्स करुन प्यायल्यास काय होईल?)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Pexels

फाटलेल्या ओठांवरील रामबाण उपाय  

केवळ चेहराच नव्हे तर तुपामुळे ओठांशी संबंधित समस्या देखील दूर होण्यास मदत मिळेल. झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावा यामुळे ओठांची त्वचा मऊ होईल.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com