Dry Fruits Benefits: बदाम-अक्रोड किती तास भिजवावे? कोणते ड्रायफ्रुट भिजवून खाल्ल्यास मिळतील फायदे

Soaked Dry Fruits Benefits: कोणते ड्रायफ्रुट किती तास भिजवावे आणि भिजवलेले ड्रायफ्रुट खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील, जाणून घ्या माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Soaked Dry Fruits Benefits: भिजवलेला सुकामेवा खाण्याचे फायदे"

Soaked Dry Fruits Benefits: ड्रायफ्रुट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. याद्वारे शरीराला कित्येक व्हिटॅमिन, खनिजे आणि हेल्दी फॅट्सचा पुरवठा होतो शिवाय शरीराला ऊर्जा मिळते तसेच मेंदूची कार्यप्रणालीही सुधारण्यास मदत मिळते. सुकामेवा भिजवून खाल्ल्यास त्याचे शरीराला दुप्पट फायदे मिळतात, हे तुम्हाला माहितीये का? 

प्रसिद्ध आयुर्वेदिक न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ल्यास त्याचे पचन सहजरित्या होते आणि शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. कोणते ड्रायफ्रुट किती तास भिजत ठेवावे आणि त्याद्वारे कोणते फायदे मिळतील? याची माहिती जाणून घेऊया... 

बदाम (Almonds)

न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदाम आठ तास भिजत ठेवावे. भिजवलेल्या बदामाद्वारे शरीराला व्हिटॅमिन ई मिळते, ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. भिजवलेल्या बदामाचे पचनही सहजरित्या होते. 

अक्रोड (Walnuts)

अक्रोड जवळपास सहा तास भिजत ठेवावे. अक्रोड हे ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचे उत्तम स्त्रोत आहे ,ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास, स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत मिळते.  

Advertisement

काजू (Cashews)

काज चार ते सहा तास भिजत ठेवावे. भिजवलेले काजू आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 

पिस्ता (Pistachios)

पिस्ता जवळपास सहा ते आठ तास भिजत ठेवल्यास शरीराला प्रोटीन आणि खनिजांचा पुरवठा होतो. याद्वारे शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायूंचे झालेले नुकसान भरुन निघण्यास मदत मिळते. 

(नक्की वाचा: रिकाम्या पोटी हा सुकामेवा भिजवून खाण्याचे फायदे, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो)

अंजीर (Anjeer)

अंजीर सहा ते आठ तास भिजत ठेवल्यानंतर खावे. याद्वारे शरीराला लोह, कॅल्शिअमचा पुरवठा होतो. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास आणि अ‍ॅनिमियाचा धोका कमी होण्यास मदत मिळते. 

Advertisement
हेजलनट्स (Hazelnuts)

हेजलनट्स आठ तास भिजत ठेवा. याद्वारे शरीराला मॅग्नेशिअमम आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होईल, जे मज्जासंस्था आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

(नक्की वाचा: Sleeping Problems: झोप येत नाही? गोळ्या घेण्याऐवजी खा हा सुकामेवा, गाढ आणि शांत झोप येईल)

ड्रायफ्रुट्स भिजत ठेवणे का आवश्यक आहे?

न्युट्रिशनिस्टने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायफ्रुट्सवर एक थर असतो. सुकामेवा भिजत ठेवल्यानंतर त्यावरील थर निघण्यास मदत मिळते आणि शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो तसेच शरीर त्यातील पोषणतत्त्व सहजरित्या शोषून घेतात.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )