Surya Namaskar Benefits: 1 दिवसात किती वेळा सूर्य नमस्काराचा सराव करावा? काय आहेत फायदे

Surya Namaskar Benefits: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित स्वरुपात सूर्य नमस्कार करणं फायदेशीर ठरेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Surya Namaskar Benefits: सूर्य नमस्काराचे फायदे"
Canva

Surya Namaskar Benefits: दिवसाची सुरुवात चांगली करायची असेल तर सूर्य नमस्काराचा सराव करणं सर्वाधिक प्रभावी व्यायाम ठरू शकतो. सूर्य नमस्कारामध्ये 12 आसनांचा समावेश आहे. ज्यामुळे शरीर लवचिक होईल, शरीराची क्षमता वाढेल तसेच मानसिक एकाग्रता वाढून तणावही कमी होण्यास मदत मिळेल. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही उपकरणांची आवश्यकता भासत नाही. सूर्य नमस्काराचा सराव करण्याचे फायदे जाणून घेऊया... 

1. शरीराचे पोश्चर सुधारते

सूर्य नमस्काराच्या सरावामुळे शरीराचे पोश्चर सुधारण्यास मदत मिळेल. नियमित सूर्य नमस्कार केल्यास शरीराचे संतुलनही सुधारते. पाठीदुखीच्या समस्यांपासून सुटका मिळेल, पाठीचा कणाही मजबूत होईल. 

2. शरीराचे वजन नियंत्रणात राहील 

नियमित सूर्य नमस्काराचा सराव केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल. हा एक संपूर्ण व्यायाम आहे, ज्यामुळे शरीराच्या कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळेल, शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळेल आणि पचनप्रक्रियाही सुधारेल. वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्काराचा सराव करणं प्रभावी व्यायाम ठरू शकतो. याव्यतिरिक्त पौष्टिक आहाराचेही सेवन करणं आवश्यक आहे. 

3. मानसिक आरोग्य

सूर्य नमस्कारामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासही लाभ मिळतील. यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळेल.  

4. रक्ताभिसरण प्रक्रिया 

सूर्य नमस्काराचा सराव केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रक्ताभिसरणाची प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू राहिल्यास शरीराच्या प्रत्येक अवयवास ऑक्सिजन आणि पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. यामुळे रक्तदाबाचा धोका दूर होईल आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहील.  

Advertisement

(नक्की वाचा: Amla Benefits: आवळा हे हिवाळ्यातील सुपरफुड का मानले जाते? थंडीत आवळा खाल्ल्यास काय होते? वाचा 5 फायदे)

5. पचनप्रक्रिया 

सूर्य नमस्काराचा सराव केल्यास शरीराची पचनप्रक्रिया, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांचा धोका कमी होईल. शरीराची चयापचयाची गती जलद होईल, वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. नियमित स्वरुपात सूर्य नमस्काराचा सराव केल्यास पचनप्रक्रियेशी संबंधित समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळेल.  

Advertisement

(नक्की वाचा: Sleep Tips: गाढ झोपेसाठी कोणत्या अवयवाचा मसाज करावा? कोणते अवयव दाबल्यास झोप पटकन येते? वाचा 100% रामबाण उपाय)

एका दिवसात सूर्य नमस्काराचा किती वेळा सरावा करावा? 

सुरुवातीस तुम्ही दिवसभरात दोनदा सूर्य नमस्काराचा सराव करू शकता, हळूहळू शरीराची क्षमता वाढल्यास सूर्य नमस्काराची संख्या वाढवू शकता.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article