जाहिरात

Sleep Tips: गाढ झोपेसाठी कोणत्या अवयवाचा मसाज करावा? कोणते अवयव दाबल्यास झोप पटकन येते? वाचा 100% रामबाण उपाय

Better Sleep Tips: रात्री गाढ झोप येत नसल्याने तुम्ही देखील त्रस्त आहात का? मग केवळ या तेलाने मसाज करा आणि या अवयवावर दाब दिल्यास पटकन झोप येईल.

Sleep Tips: गाढ झोपेसाठी कोणत्या अवयवाचा मसाज करावा? कोणते अवयव दाबल्यास झोप पटकन येते? वाचा 100% रामबाण उपाय
"Better Sleep Tips: चांगली आणि गाढ झोप येण्यासाठी उपाय"
Canva

Better Sleep Tips: शांत, निवांत आणि गाढ झोप ही आताच्या धकाधकीच्या जीवनात सर्वात मोठी गरजेची गोष्ट ठरतेय, पण काही केल्या लोकांची रात्रीची झोप पूर्ण होत नाहीय. रात्री उशीरापर्यंत मोबाइल पाहत राहणे, विचार करत राहणे, मानसिक ताण आणि अनियमित लाइफस्टाइलसह इत्यादी गोष्टींमुळे झोपेवर दुष्परिणाम होतात. काही लोक बिछान्यावर पडून केवळ कूस बदलत राहतात, असे करता करता रात्री झोपायला उशीर होतो आणि सकाळी डोळे उघडत नाहीत. अशातच पाच मिनिटांत झोप येण्यासाठी काहीतरी जादू व्हावी, असाही विचार लोकांच्या मनात येतो. झोप लवकर येण्यासाठी शरीराचे काही पॉइंट किंवा अवयव दाबल्यास मेंदू शांत होण्यास मदत मिळेल. बोटाचे पॉइंट दाबण्यापासून ते योग आणि श्वासोच्छवासाशी संबंधित योग्य तंत्राचा अवलंब केल्यास औषधं न घेताही चांगली झोप येऊ शकते.   

झोपेसाठी कोणते बोट दाबावे? (Which Finger to Press for Sleep)

करंगळीच्या खालील बाजूस तळहाताच्या भागावर दोन ते तीन मिनिटांसाठी दाब द्यावा, यामुळे हृदयाची धडधड सामान्य होते आणि मेंदूला आराम मिळतो. हा उपाय केल्यास अस्वस्थता कमी होऊन चांगली झोप येते. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास फायदे मिळतील. 

शरीराचे कोणते पॉइंट दाबल्यास चांगली झोप येते? (Acupressure Points for Better Sleep)

चांगली झोप येण्यास मनगटाच्या आतील बाजूस एक पॉइंट असतो, जो झोपेसाठी अतिशय प्रभावी मानला जातो. यास शेन मेन पॉइंट असंही म्हटलं जातं. या बिंदूवर अंगठ्याने हळूहळू दाब द्यावा आणि गोलाकार दिशेने मसाज करावा. जवळपास तीन ते पाच मिनिटांनंतर मेंदूवरील ताण हलके झाल्यासारखे वाटेल. याव्यतिरिक्त पायांच्या तळव्यांच्या मधोमध असणाऱ्या पॉइटवरही दाब द्यावा. झोपण्यापूर्वी शरीराच्या या पॉइंटवर दाब दिल्यास लवकर झोप येण्यास मदत मिळू शकते. 

पाच मिनिटांत झोप कशी येईल? (How to Fall Asleep in 5 Minutes)

पाच मिनिटांत झोप येण्यासाठी सर्वाधिक सोपा उपाय म्हणजे दीर्घ श्वासोच्छवासाचा सराव करणे. बिछान्यावर झोपून डोळे बंद करा आणि चार सेकंद श्वास घ्या, चार सेकंद श्वास थांबवा आणि सहा सेकंदात श्वास हळूहळू सोडावा. पाच वेळा हा सराव केल्यास मज्जासंस्था शांत राहण्यास मदत मिळते. यासह खोलीचा लाइट बंद करावा, मोबाइलपासून दूर राहावं. याद्वारे मेंदूला आराम करण्याची वेळ झाल्याचे संकेत मिळतील आणि पटकन झोप येईल. 

शांत झोपेसाठी उपाय (How to Sleep Fast Naturally)

लवकर झोप येण्यासाठी शरीर शिथिल करणं आवश्यक आहे. पायांपासून सुरुवात करत डोक्यापर्यंतचा भाग हळूहळू सैल सोडण्याचा प्रयत्न करावा. मनातील विचारांचे चक्र थांबवावे, याऐवजी शांत दृश्याची कल्पना करावी, उदाहरणार्थ पाऊस, हिरवळ, डोंगर इत्यादी. डोळे बंद केल्यास झोप येत नसेल तर उगाचच जबरदस्तीने डोळे बंद करू नये, स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा, काही मिनिटे तुम्हाला शांत वाटेल आणि झोप येईल.

Mouth Taping Trend: तोंडावर टेप लावून का झोपत आहेत लोक? माऊथ टेपिंग म्हणजे नेमकं काय? वाचा फायदे आणि नुकसान

(नक्की वाचा: Mouth Taping Trend: तोंडावर टेप लावून का झोपत आहेत लोक? माऊथ टेपिंग म्हणजे नेमकं काय? वाचा फायदे आणि नुकसान)

झोपेसाठी कोणत्या आसनांचा सराव करावा? (Best Yoga for Quick Sleep)

लवकर झोप येण्यासाठी शवासनाचा सराव करावा. शवासनासाठी पाठीवर झोपा आणि संपूर्ण शरीर सैल सोडावा, यामुळे मेंदूसह स्नायूंना आराम मिळतो. यामुळे चांगली झोप येईल आणि वारंवार झोप मोडण्याच्या समस्येतूनही सुटका मिळेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com