How To Stop Peeing At Night Naturally: निरोगी आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशा प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे. पूर्ण झोपेमुळे शरीर सक्रिय राहील आणि तुम्हालाही ताजेतवाने वाटेल. दिवसभराची कामं करण्यासाठी शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहील. पण रात्रीच्या वेळेस वारंवार येणाऱ्या लघवीच्या समस्येमुळे काही लोकांच्या झोपेवर दुष्परिणाम होतात. यामुळे झोप पूर्ण होत नाही, परिणामी त्यांना थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. तसेच चिडचिडही होते. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत आहात का? तर या लेखाद्वारे सोपा उपाय जाणून घेऊया, ज्यामुळे तुमची झोप मोडणार नाही.
पायाखाली उशी ठेवा
झोपण्यापूर्वी जवळपास 90 मिनिटे आधी 20-30 मिनिटांसाठी पायांखाली तीन उशा ठेवून झोपा. कित्येकदा दिवसभर उभे किंवा बसून राहिल्यास पायांच्या भागामध्ये अतिरिक्त पाणी जमा होऊ लागते. विशेषतः वाढत्या वयोमानानुसार ही समस्या वाढत जाते. पायाखाली उशी ठेवून झोपल्यास पाणी पुन्हा रक्तामध्ये मिसळते आणि किडनी ते पाणी फिल्टर करते. शिवाय रात्रीच्या वेळेस वारंवार लघवीला जाण्याची समस्याही कमी होईल. जर तुम्ही रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकार किंवा ब्लडप्रेशर यासारख्या समस्यांचा सामना करत असाल तर या उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(नक्की वाचा: Sleeping Problems: झोप येत नाही? गोळ्या घेण्याऐवजी खा हा सुकामेवा, गाढ आणि शांत झोप येईल)
रात्री झोपताना जास्त पाणी पिऊ नये
रात्री वारंवार लघवी होऊ नये, यासाठी झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळावे. तसेच योग्य वेळेमध्ये पाणी प्यावे. चुकीच्या वेळेस पाणी प्यायल्यास रात्री वारंवार लघवीला जावे लागू शकते. दिवसभरात जवळपास 75% पाणी प्यावे आणि द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे. झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जास्त पाणी पिणे, चहा, कॉफी, मद्यपान, शीतपेय पिणे टाळावे. यामुळे मुत्राशयावर कमी ताण येईल आणि झोपही मोडणार नाही.
(नक्की वाचा : Better Sleep Tips: 5 मिनिटांत येईल गाढ झोप, झोपण्यापूर्वी दुधामध्ये चिमूटभर ही पावडर मिक्स करुन प्या)
या दोन सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर रात्री वारंवार लघवीला येणार नाही. चांगली आणि गाढ झोप येईल, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)