How To Use Oil: धूर येईपर्यंत तेल गरम करता? ही चूक तुमच्या हृदयासह या 3 अवयवांसाठी ठरेल घातक

How To Use Oil: आहारामध्ये तेल वापरताना तुम्ही देखील याच 10 चुका करताय का? वाचा डॉक्टरांनी दिलेली महत्त्वाची माहिती.

जाहिरात
Read Time: 2 mins
"How To Use Oil: आहारामध्ये तेल वापरताना या 10 चुका टाळा"

How To Use Oil: स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरायचे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आजही कित्येक महिलांना मिळालेले नाही. त्यामुळे बाजारात जे तेल उपलब्ध असते, गृहिणी तेच तेल स्वयंपाकासाठी वापरतात. पण डॉ. रविंद्र कुलकर्णी (Dr Ravindra L. Kulkarni MD) यांच्या मते तेल कोणते वापरायचे याऐवजी तेल कसे वापरायचे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण महागडे तेल किंवा स्वयंपाकामध्ये तेलाचे प्रमाण कमी करुनही बीपी, कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर, अ‍ॅसिडिटी, पीसीओएस यासारख्या समस्या कमी होत नाही,अशी अनेकांची तक्रार असते. यामागील मोठे कारण म्हणजे तुम्ही आहारातील तेलाचे प्रमाण कमी केले असेल पण चुकीच्या पद्धतीने तेल वापरले तर त्रास वाढणारच आहे. 

डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी तेलाच्या वापराबाबत घराघरामध्ये होणाऱ्या चुकांबाबत सांगितलेली माहिती जाणून घेऊया...

आहारामध्ये तेलाचा वापर करताना होणाऱ्या 10 चुका | Common Cooking Mistakes 

1. तेल तापवताना धूर येईपर्यंत गरम करणे. यामुळे टॉक्सिक स्मोक कम्पाउंड्स तयार होतात; जे फुफ्फुस, हृदय आणि यकृत यासारख्या अवयवांसाठी घातक आहे.

2. एकच तेल वर्षभर वापरणे. यामुळे शरीरामध्ये वेगवेगळे फॅटी अ‍ॅसिड तयार होऊ लागतात. याऐवजी तीळ, मोहरी, शेंगदाणे, सूर्यफुल, सोयाबीन असे वेगवेगळे तेल आळीपाळीने वापरावे.

3. तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणे टाळा. तळण्यासाठी आधी वापरलेले तेल वारंवार वापरणे. एकदा गरम केलेले तेल ऑक्सिडाइज होते, त्यामध्ये कॅन्सरकारक पदार्थ तयार होतात.

Advertisement

4. तेल तूप एकत्र खाणे टाळा. कारण ते पचायला जड असते, यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होऊ लागते. 

(नक्की वाचा: Navel Oiling Benefits: 21 दिवस नाभीवर तेल लावल्यास काय होते? Dr. Hansa Yogendra यांनी सांगितले कोणते तेल वापरावे)

5. रीफाइंड ऑइलवर अवलंबून राहू नका. याऐवजी लाकडी घाण्यावर काढलेले तेल आरोग्यासाठी पोषक असते.

6. पूर्णपणे तेलाचे सेवन करणे टाळणे देखील चुकीचे आहे. यामुळे काही महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वांचा शरीराला पुरवठा होणार नाही, परिणामी हार्मोन्सचे संतुलन बिघडते.

Advertisement

7. रोज तळलेले खाद्यपदार्थ खाणे टाळा. यामुळे शरीरामध्ये जळजळ होणे, इन्सुलिन रेसिस्टन्स आणि फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते. 

8. ओले खोबरे, बदाम, अळशीच्या बिया, गुळवेल यामधील फॅट्स हे सुपरफुड आहेत. याद्वारे शरीराला नैसर्गिक तेलाचा पुरवठा होईल. 

9. स्वयंपाकामध्ये अंदाजाने तेल वापरणे टाळावे.  

(नक्की वाचा: Mouth Ulcer Remedy: तोंड येण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात? 3 घरगुती उपाय करा आणि कायमची सुटका मिळवा)

10. तेल वापरण्याबाबतच्या सवयी वेळीच बदला, अन्यथा दीर्घकाळ औषधोपचार करावे लागतील. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )