जाहिरात

Mouth Ulcer Remedy: तोंड येण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात? 3 घरगुती उपाय करा आणि कायमची सुटका मिळवा

Mouth Ulcer Remedy: तुम्ही देखील वारंवार तोंड येण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर यामागील प्रमुख कारण तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी असू शकतात.

Mouth Ulcer Remedy: तोंड येण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात? 3 घरगुती उपाय करा आणि कायमची सुटका मिळवा
​​​​​​​Mouth Ulcer Home Remedies: तोंड येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

Mouth Ulcer Remedy News In Marathi: धकाधकीचे जीवन आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयीमुळे बहुतांश लोक आरोग्याशी संबंधित विविध समस्यांचा सामना करतात. यापैकीच एक समस्या म्हणजे तोंड येणे. ही समस्या दिसायला अतिशय किरकोळ वाटत असली तरीही यामुळे होणारा त्रास मोठा आहे. तोंड येण्याच्या समस्येमुळे वेदना आणि जळजळ खूप होते. यामुळे खाण्यापिण्यामध्ये समस्या निर्माण होतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तोंड येण्यामागील प्रमुख कारण म्हणजे पोट स्वच्छ न होणे, तिखट पदार्थ खाणे, पोटातील उष्णता, कमी झोप, तणाव आणि शरीरातील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता असू शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक बाजारातील औषधे आणि माऊथवॉशचा वापर करतात. पण तरीही त्रास आणि वेदना कमी होत नाही. तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधताय का? तर जाणून घेऊया काही घरगुती उपाय...

तोंड येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies for Mouth Ulcer)

हळद आणि मध 

हळद आणि मधाचा वापर केल्यास तोंड येण्याच्या समस्येतून सुटका मिळू शकते. यासाठी अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि चिमूटभर हळद मिक्स करा. या पाण्याने दिवसभरात दोन ते तीन वेळ गुळण्या कराव्या. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आणि मधातील औषधी गुणधर्मामुळे तोंडामध्ये आलेले पुरळ कमी होतील.  

नारळ पाणी आणि नारळाचे तेल 

नारळ पाण्याची प्रकृती थंड असते. रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळेल. तसेच तोंडामध्ये आलेल्या पुरळांवर नारळाचे तेल लावून दोन ते तीन मिनिटांसाठी मसाज केल्यास सूज आणि जळजळ कमी होईल. 

Health News: घरीच बीपी चेक करता का? डॉक्टरांनी सांगितली Blood Pressure तपासण्याची योग्य पद्धत

(नक्की वाचा: Health News: घरीच बीपी चेक करता का? डॉक्टरांनी सांगितली Blood Pressure तपासण्याची योग्य पद्धत)

तुळस आणि गुळवेलीचा रस 

  • सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची चार ते पाच चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्यावे. 
  • हवे असल्यास यामध्ये गुळवेलीचा रस देखील मिक्स करू शकता.  
  • तुळशीमध्ये अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत तर गुळवेलीच्या रसामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळू शकते. 

Chewing Neem Leaves Benefits: दात न घासता चघळून खा कडुलिंबाची पाने, 4 समस्या होतील समूळ नष्ट

(नक्की वाचा:  Chewing Neem Leaves Benefits: दात न घासता चघळून खा कडुलिंबाची पाने, 4 समस्या होतील समूळ नष्ट)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com