
Navel Oiling Benefits: छोट्या-मोठ्या शारीरिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नाभीमध्ये तेल लावण्याचा सल्ला तुम्ही अनेकदा ऐकला असेल. आयुर्वेदामध्ये या प्रक्रियेस 'नाभी चिकित्सा' किंवा 'पेचोटी विधी' असे म्हणतात. ही फार जुनी आणि प्रभावी औषधोपचार पद्धती आहे. या प्रक्रियेत नाभीमध्ये तेलाचे काही थेंब सोडले जातात आणि हलक्या हाताने नाभीचा (Navel Oiling Benefits) मसाज केला जातो. आयुर्वेदानुसार नाभी आपल्या शरीरातील एक असा बिंदू आहे, जो शरीराच्या 72,000 नसांशी जोडलेला असतो. नाभीमध्ये तेल लावल्यास शरीराला कोणकोणते फायदे मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नाभीवर तेल लावण्याचे फायदे
योगगुरू डॉक्टर हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर नाभीवर तेल (Navel Oiling Benefits) लावण्याशी संबंधित व्हिडीओ शेअर केलाय. सलग 21 दिवस झोपण्यापूर्वी नाभीवर तेल लावण्याचे फायदे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहेत.
पचनप्रक्रिया सुधारते
डॉ. हंसा योगेंद्र यांच्या माहितीनुसार, नाभीच्या खालील बाजूस 'अग्नी केंद्र'असते, जे पचन प्रक्रिया आणि युरिन सिस्टिम नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. अपचन, गॅस, अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असेल तर नारळाच्या तेलाचे काही थेंब आले आणि पुदिना एसेंशिअल ऑइलमध्ये मिक्स करुन नाभीवर लावा. सलग 21 दिवस हा उपाय केल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा: नाभीवर हे 2 तेल लावल्यास केसांची होईल भराभर वाढ)
त्वचेवर येते नैसर्गिक तेज
योगगुरू हंसा यांच्या माहितीनुसार, रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर नारळ किंवा बदामाचे तेल लावल्यास शरीर आतील बाजूने हायड्रेट राहण्यास मदत मिळते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि सतेज होते.
हार्मोन संतुलित होतात
नाभीवर एरंडेल तेल कोमट करुन लावल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित होण्यास मदत मिळेल आणि मासिक पाळीच्या वेदना देखील कमी होतील.
दृष्टी सुधारेल
योगगुरू हंसा यांच्या मते, सलग 21 दिवस गाईचे तूप किंवा तिळाचे तेल लावल्यास डोळ्यांचा कोरडेपणा कमी होऊ शकतो आणि दृष्टी देखील सुधारेल.
(नक्की वाचा: Hing Benefits: नाभीवर हिंग लावल्यास काय होते?)
तणाव आणि चांगली झोप मिळेल
लव्हेंडर किंवा कॅमोमाइल ऑइलने नाभीचा मसाज केल्यास शारीरिक ताण कमी होईल आणि चांगली झोप देखील आहे.
शरीर स्वच्छ होईल नाभीवर तेल लावण्याची योग्य पद्धत काय आहे?- डॉक्टर हंसा योगेंद्र यांनी स्वतःच्या आवश्यकतेनुसार तेलाची निवड करण्याचा सल्ला दिलाय.
- तेल थोडेसे गरम करावे.
- रात्री झोपण्यापूर्वी तेल कोमट करुन तेलाचे काही थेंब नाभीवर सोडा.
- हलक्या हाताने मसाज करा आणि नाभीमध्ये तेल रात्रभर राहू द्यावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world