Linguda Benefits: बीपीपासून ते पचनप्रक्रियेसाठी वरदान आहे विचित्र दिसणारी हिरवी भाजी, तुम्हाला माहितीय का नाव?

Linguda Benefits: हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण एक रानभाजी अशी आहे की जी केवळ पावसाळ्यात उपलब्ध होते. विशेष म्हणजे या भाजीमध्ये औषधीय गुणधर्मांचा साठा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कित्येक गंभीर आजारांवर रामबाण उपाय आहे ही भाजी

Linguda Benefits: पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते, कारण या वातावरणात ओलावा, दुर्गंधी आणि वातावरणात सतत बदल होत असतात. तसेच कित्येक साथीचे आजारही पसरतात. त्यामुळे डाएटमध्ये शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा. डाएटमध्ये पालेभाज्या आणि हंगामी फळांचा समावेश करणं तितकेच आवश्यक आहे. पण लिंगुडा नावाची रानभाजी देखील शरीरासाठी पोषक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही भाजी विविध नावांनी ओळखली जाते. 

लिंगुडा भाजीतील पोषणतत्त्व

अमेरिकी वेबसाइट 'वेबएमडी' आणि अन्य न्युट्रिशन पोर्टल्सनुसार, लिंगुडाचे वनस्पतीचे नाव मैटेरिया स्ट्रुथिओप्टेरिस आहे. या भाजीमध्ये जवळपास 6 ग्रॅम प्रोटीन, 3 ग्रॅम फायबर, 2 मिलिग्रॅम लोह, 31 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी, 8 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि केवळ 1 ग्रॅम फॅट्स असते. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, पोटॅशिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडिअम आणि कॅरोटिन यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. 

लिगुंडा भाजी विशेषतः उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांच्या डोंगराळ भागामध्ये आढळते. चवीसह या भाजीमध्ये औषधीय गुणधर्मांचा समावेश आहे. काही लोक या भाजीचे लोणचे देखील करतात.  

कोलेस्टेरॉल 

लिंगुडातील फायबरमुळे शरीरात जमा झालेली कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होऊ शकतो. लिंगुडातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे रक्तवाहिन्या निरोगी राहण्यास मदत मिळते.

Advertisement

रक्तदाब

रक्तशर्करा आणि बीपी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. लिंगुडामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर ठरते. 

Advertisement

(नक्की वाचा: Gut Health News: पोट आणि पचनप्रक्रियेसाठी 2 मसाले ठरतील वरदान, आतड्यांची पटकन होईल स्वच्छता; वाचा उपाय)

पचनप्रक्रिया

चयापचयाची क्षमता

वजन कमी होण्यास मदत मिळेल. कॅलरीज्, कमी फॅट्स आणि अधिक फायबर असणाऱ्या भाजीमुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Advertisement

(नक्की वाचा: Guava Leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही 2 हिरवी पाने, 6 मोठ्या समस्यांपासून मिळेल सुटका)

लोहाचा उत्तम स्त्रोत

लिंगुडामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळू शकते. लोहामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )