जाहिरात

Guava Leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही 2 हिरवी पाने, 6 मोठ्या समस्यांपासून मिळेल सुटका

Guava Leaves Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी हिरव्या रंगाची दोन पाने चावून खाल्ल्यास शरीराचे कित्येक समस्यांपासून संरक्षण होण्यास मदत मिळू शकते. या सहा लोकांच्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल होतील.

Guava Leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही 2 हिरवी पाने, 6 मोठ्या समस्यांपासून मिळेल सुटका
Chewing Guava Leaves: हिरवी पाने खाण्याचे फायदे

Guava Leaves Benefits: डाएटमध्ये फळांचा समावेश केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतात. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार तज्ज्ञांकडून कोणती फळे खावी आणि कोणती फळे खाऊ नये, याबाबत सल्ला दिला जातो. पेरु हे फळ खाण्याचेही असंख्य आरोग्यवर्धक लाभ आहेत. पेरुप्रमाणे पेरुची पाने खाणे देखील आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. आयुर्वेदिक उपचारांमध्येही पेरुच्या पानांचा समावेश केला जातो. पेरुच्या पानांवरही (Guava Leaves Benefits) कित्येक संशोधन करण्यात आले आहे. आयुर्वेदिक वैद्य सलीम जैदी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून पेरुच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे सांगितले आहेत, जाणून घेऊया माहिती...

मधुमेहींसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांनी डाएटमध्ये पेरुच्या पानांचा (Guava Leaves Benefits) समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. NCBIमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रीसर्च माहितीनुसार, पेरुच्या पानांमध्ये अशा काही कम्पाउंड्सचा समावेश आहे, जे रक्तातील साखर शोषून घेण्याचे काम करते. यासह स्टार्चचे साखरेमध्ये रुपांतर होण्याची प्रक्रिया देखील ही पाने रोखण्याचं काम करतात. यामुळे शरीरातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते आणि इन्सुलिनची पातळी देखील वाढत नाही.   

वजन कमी होण्यास मदत मिळते

रीसर्चमधील माहितीनुसार, पेरुच्या पानांमध्ये काही बायोअ‍ॅक्टिव्ह कम्पाउंड असतात, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळते. यासह शरीरातील शर्करेचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. परिणाम वजन कमी होण्यासाठी पेरुच्या पानांचे सेवन करू शकता. 

(नक्की वाचा: Guava Leaf Tea Recipe : पेरुच्या पानांपासून हर्बल चहा कसा तयार करावा?)

कोलेस्टेरॉल 

पेरुच्या पानांमधील पोषकघटकांमुळे शरीरात वाढलेली कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते. पेरुच्या पानांचा चहा किंवा काढा तुम्ही पिऊ शकता. यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते. परिणामी हृदयविकारांचा धोका कमी होईल. 

पचनप्रक्रिया 

पेरुच्या पानांचे योग्य पद्धतीने सेवन करणे पचनप्रक्रियेस लाभदायक ठरू शकते. पेरुच्या पानांचा काढा पिऊन तयार केल्यास किंवा रिकाम्या पोटी पेरुची पाने चावून खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उदाहरणार्थ गॅस, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून सुटका होईल.  

तोंडाचे आरोग्य

वारंवार तोंड येण्याची समस्या असेल तर तोंडाला सूज येत असेल किंवा दातदुखीची समस्या असेल तर पेरुच्या पानांचा उपाय करावा. ग्लासभर पाण्यात पेरुची सात ते आठ पाने व्यवस्थित उकळा आणि त्या पाण्याने गुळण्या करा.   

(नक्की वाचा: Peru Seeds Benefits: पेरुच्या बिया खाण्याचे फायदे)
त्वचा

मुरुम किंवा त्वचेवरील डागांपासून सुटका हवी असल्यास पेरुच्या पानांचा वापर करावा. पेरुच्या पानांमध्ये अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, जे त्वचेवरील जंतूंचा खात्मा करतात. यासह त्वचेचा रंग, पोतही सुधारतो. डोळ्यांखालील काळी वर्तुळांची समस्याही दूर होईल. पेरुची चार ते पाच पाने स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याची पेस्ट तयार करुन चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. आठवड्यातून दोनदा हे फेस पॅक लावा. तुम्हाला त्वचेवर फरक दिसेल.  

नियमित कसे करावे सेवन? 

- पेरुची दोन कोवळी पाने घ्या, स्वच्छ धुवा आणि रिकाम्या पोटी चावून खा. 
- पेरुची पाने चावून खाणे कठीण वाटत असेल तर काढा तयार करू शकता. रिकाम्या पोटी काढा प्यायल्यास लाभदायक ठरू शकेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com