जाहिरात

Gut Health News: पोट आणि पचनप्रक्रियेसाठी 2 मसाले ठरतील वरदान, आतड्यांची पटकन होईल स्वच्छता; वाचा उपाय

Gut Health News: पोटाच्या आरोग्यावर संपूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असते. पचनप्रक्रिया निरोगी असेल तर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते, मूड चांगला राहतो आणि आजारांपासूनही शरीराचे संरक्षण होते. किचनमधील दोन मसल्यांमुळेही पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मोठी मदत मिळते.

Gut Health News: पोट आणि पचनप्रक्रियेसाठी 2 मसाले ठरतील वरदान, आतड्यांची पटकन होईल स्वच्छता; वाचा उपाय
Health News: आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी रामबाण उपाय

Gut Health News: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच अयोग्य लाइफस्टाइलमुळे पोटाचे आरोग्य बिघडते. गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठतेसारख्या समस्येमुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतात. यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहणे गरजेचे आहे. पण पोटाचे आरोग्य आणि पचनप्रक्रिया निरोगी राहण्यासाठी नेमके काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. पचनप्रक्रियेच्या समस्येतून सुटका हवी असल्यास तुम्ही किचनमधील मसाल्यांचा वापर करू शकता, हे तुम्हाला माहितीये का? गरम मसाल्याच्या डब्यातील बडीशेप आणि ओवा निरोगी पचनप्रक्रियेसाठी वरदान ठरतील. या दोन मसाल्यांमुळे केवळ स्वयंपाकाची चव नव्हे तर गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळेल.  

आयुर्वेदानुसार बडीशेप आणि ओवा पचनशक्ती सुधारण्यासाठी नैसर्गिक टॉनिक मानले जाते. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने ओवा-बडीशेपचे सेवन केले तर पोट हलके राहण्यास, मन शांत होण्यास आणि शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळेल. 

ओवा-बडीशेपचा वापर करण्याची योग्य पद्धत

बडीशेपचे फायदे आणि वापर करण्याची योग्य पद्धत (Saunf Benefits)

  • बडीशेपची चव हलकीशी गोड असते आणि यातील पोषकघटकांमुळे शरीराला थंडावा मिळतो. बडीशेपमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर हे गुणधर्म आहेत, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. 
  • जेवल्यानंतर बडीशेप चावून खाल्ल्यास गॅस आणि पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.
  • रात्रभर ग्लासभर पाण्यात एक चमचा बडीशेप भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यावे. पोट स्वच्छ होईल आणि शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होईल. 
  • गरम पाण्यात बडीशेप उकळून त्याचे पाणी प्यायल्यास पोटातील जळजळ आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होईल.

Badam Benefits: बदाम खाण्याची योग्य पद्धत काय? किती खावे, कधी खावे आणि कसे खावे? जाणून घ्या माहिती

(नक्की वाचा: Badam Benefits: बदाम खाण्याची योग्य पद्धत काय? किती खावे, कधी खावे आणि कसे खावे? जाणून घ्या माहिती)

ओवा खाण्याचे फायदे (Ajwain Benefits) 

  • ओवा चवीला थोडेसे तिखट असते, पण शरीरावर त्याचा होणारा परिणाम फार मोठा असतो. 
  • ओव्यातील पोषणतत्त्वांमुळे पोटातील गॅस, पोट जड होणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 
  • चिमूटभर ओवा आणि काळे मीठ एकत्रित खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारेल. 
  • ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा ओवा उकळा आणि पाणी थंड करुन प्या. यामुळे गॅस, पोट फुगणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.  
  • गुळासोबत ओवा खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.   
  • जेवणानंतर एकदा बडीशेप खा आणि आठवड्यातील काही दिवस ओव्याचे पाणी प्या.  

Guava Leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही 2 हिरवी पाने, 6 मोठ्या समस्यांपासून मिळेल सुटका

(नक्की वाचा: Guava Leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही 2 हिरवी पाने, 6 मोठ्या समस्यांपासून मिळेल सुटका)

 (Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com