Almonds Benefits: सुकामेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्येही बदाम म्हणजे सुकामेव्याचा राजा. बदामामध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्स या गुणधर्मांचे प्रमाण जास्त असते. हे पोषणतत्त्व शरीर, मेंदू आणि त्वचेसाठी आवश्यक असतात. पण तुम्हाला बदामांचे प्रकार आणि सर्वाधिक महागडे बदाम याबाबत माहिती आहे का? बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या बदामांची गुणवत्ता आणि किंमत एकसारखी नसते. जाणून घेऊया सर्वात महागडे बदाम कोणते, बदामांचा राजा कोण आणि महागडे बदाम खाण्याचे फायदे.
सर्वाधिक महागडे बदाम
ममरा बदाम (Mamra Almond) हे जगातील सर्वाधिक महागडे बदाम म्हणून प्रसिद्ध आहे. ममरा बदाम इराण, अफगाणिस्तान, भारत आणि पर्वतीय भागांमध्ये मिळतात. या बदामाचे वैशिष्ट्य जाणून घेऊया...
ममरा बदामाचे वैशिष्ट्य
- ममरा बदाम शंभर टक्के नैसर्गिक असते, या बदामावर कोणत्याही प्रकाराची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे याची किंमत महाग असते.
- ममरा बदामाचा आकार लहान असतो, पण कॅलिफोर्निया बदामाच्या तुलनेत 50 टक्के अधिक पोषणतत्त्व असतो.
- हेल्दी फॅट्स (ओमेगा-3 आणि ओमेगा-6), प्रोटीन आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते.
- शरीराला ऊर्जा मिळते, विशेषतः हिवाळ्यामध्ये या बदामाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
एक किलो वेगवेगळ्या बदामांची किंमत काय आहे?
बदामाची किंमत प्रकार आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. खालील नमूद केलेली किंमत अंदाजे आहे (2025 नुसार)
- ममरा बदामाची (Mamra Almond) किंमत 1800 – 3000 रुपये प्रति किलो इतकी आहे.
- कॅलिफोर्निया बदामाची किंमत 800 –1200 रुपये प्रति किलो आहे.
- काश्मिरी बदामाची किंमत 1200 – 2000 रुपये प्रति किलो इतकी आहे.
- गिरी बदामाची (तुकडा) किंमत 600 – 900 रुपये प्रति किलो इतकी आहे.
(नक्की वाचा: Badam Benefits: बदाम खाण्याची योग्य पद्धत काय? किती खावे, कधी खावे आणि कसे खावे? जाणून घ्या माहिती)
बदाम खाण्याची योग्य पद्धत
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी चार ते सहा बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी झोपून उठल्यानंतर साल काढून बदामाचे सेवन करा. दुधामध्येही मिक्स करून तुम्ही बदाम खाऊ शकता.
(नक्की वाचा: Almonds Benefits: रोज भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे)
दिवसभरात किती बदाम खाल्ले पाहिजे?
- प्रौढांनी पाच ते सात भिजवलेले बदाम खाणे पुरेसे ठरेल.
- लहान मुलांनी दोन ते तीन भिजवलेले बदाम खावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)