When To Replace Matka: मडके कधी बदलावे, मडक्याची एक्सपायरी डेट कशी ओळखावी? जुन्या मडक्यामुळे काय परिणाम होतील?

When To Replace Matka: उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिणे फायदेशीर आहे, पण जुना मडके वापरणे धोक्याचे ठरू शकते. मडके कधी बदलावा, त्याची स्वच्छता कशी करावी आणि आरोग्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबद्दलची सविस्तर माहिती.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Right Time to Replace Matka: पाण्याचे मडके कधी बदलावे?"
Canva

When To Replace Matka: उन्हाळा सुरू झाला की घरोघरी फ्रिजच्या पाण्याऐवजी मातीच्या मडक्यातील (माठ) थंडगार पाणी पिण्याला पसंती दिली जाते. मडक्यातील पाणी केवळ नैसर्गिकरीत्या थंड नसते, तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. पण अनेक जण वर्षानुवर्षे तेच तेच जुने मडके वापरतात. तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही वापरत असलेल्या मडक्यालाही एक एक्सपायरी डेट असते? योग्य वेळी मडके न बदलणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

मडके कधी बदलावे? (When to Replace)

मडक्यावर कोणतीही एक्सपायरी डेट लिहिलेली नसते तरीही काही संकेतांवरून तो बदलण्याची वेळ आली आहे हे ओळखावे. योग्य वेळेस मडके बदलावा अन्यथा पाण्याच्या गुणवत्तेवर दुष्परिणाम होऊ शकतात. 
भेगा किंवा गळती: जर मडक्याला बारीक तडे गेले असतील किंवा पाणी झिरपत असेल, तर तो तातडीने बदलावा.
बुरशीचा प्रादुर्भाव: मडक्याच्या आत किंवा कडांवर काळे किंवा हिरव्या रंगाचे डाग दिसू लागल्यास ती बुरशी असू शकते. असे पाणी प्यायल्याने पोटाचे विकार होऊ शकतात.
दुर्गंधी: वारंवार मडका धुवूनही त्यातून मातीचा नैसर्गिक सुवास येण्याऐवजी कुबट वास येत असेल, तर त्यात बॅक्टेरिया जमा झाले आहेत असे समजावे.

Advertisement

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री झोप लागत नाही? फॉलो करा तज्ज्ञांनी सांगितलेला हा '3-3-3' नियम, येईल शांत आणि गाढ झोप)

मडक्याची स्वच्छता कशी करावी?

  • मडके दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्याची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. दर दोन तीन दिवसांनी मडके रिकामी करून स्वच्छ पाण्याने धुवावा. 
  • आठवड्यातून एकदा मऊ ब्रशने किंवा कापडाने आतील बाजू घासून स्वच्छ करावी. 
  • लक्षात ठेवा मडके धुताना कोणत्याही रासायनिक साबणाचा किंवा डिटर्जंटचा वापर करू नये, कारण मातीची छिद्रे ते शोषून घेतात.
  • मडके कायम झाकून ठेवावे, जेणेकरून त्यावर धूळ-कीड्यांचा प्रादुर्भाव होणार नाही.  
एक मडके किती काळ वापरावे?

तज्ज्ञांच्या मते वर्षभरासाठी एक मडके वापरणे योग्य ठरेल. पण अनेक जण मागील वर्षाचे मडके पुन्हा वापरतात. जर मडके व्यवस्थित असेल, त्याला वास येत नसेल आणि तो स्वच्छ असेल तर वापरण्यास हरकत नाही. पण नव्या ऋतूमध्ये नवीन मडके घेणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित ठरेल, कारण जुन्या मडक्याची पाणी थंड करण्याची क्षमता (Porous nature) कमी झालेली असते. स्वच्छतेचे नियम पाळल्यास मडके केवळ पाणी थंडच ठेवत नाही, तर उन्हाळ्यात तुमचे आरोग्यही उत्तम राखतो. पण या सर्व गोष्टी वापरात असलेल्या मडक्यामध्ये आढळत नसतील ते तातडीने बदलावे.

(नक्की वाचा: How To Use AC In Summer: AC बंद करताच रूम गरम होते? जाणून घ्या उन्हाळ्यात रूम थंड ठेवण्यासाठी 8 टिप्स)

पाण्याचे मडके कधी बदलावे?

मडक्याची एक्सपायरी डेट नसते, पण मडक्याची परिस्थिती आणि स्वच्छता यावरून मडके वापरण्यास योग्य आहे की नाही, हे ठरवावे. मडके खराब झाले असेल तर ते बदलावे अन्यथा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )