Salt Water Benefits: मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास काय होतं? किती पाण्यामध्ये किती मीठ मिक्स करावं?

Salt Water Benefits: मिठाच्या पाण्याने गुळण्या करणं हा एका जुना आणि रामबाण उपाय आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Health News: मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे"
Canva

Salt Water Benefits: मिठाच्या पाण्याने गुळण्या करणं हा एक रामबाण घरगुती उपाय आहे. घशातील खवखव कमी करण्यासाठी तुम्ही आजी-आईकडून हा उपाय करण्याचा सल्ला अनेकदा ऐकला असेलच. पण मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास काय होते? मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याची योग्य पद्धत आणि किती प्रमाणात पाणी तसेच मीठ घ्यावे, याबाबत माहिती जाणून घेऊया... 

मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे

तोंडातील बॅक्टेरियांचा खात्मा

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचा सर्वाधिक मोठा फायदा म्हणजे तोंडातील हानिकारक बॅक्टेरियांचा खात्मा होण्यास मदत मिळेल. मिठाच्या पाण्यामुळे तोंडातील पीएच स्तर वाढतो, यामुळे तोंडामध्ये बॅक्टेरियांची निर्मिती होणे थांबते. 

पिवळ्या दातांची समस्या 

तोंडातील बॅक्टेरियांची संख्या कमी झाल्यास दातांवर पिवळा थर जमा होण्याची समस्याही कमी होते. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास पिवळ्या दातांची समस्या कमी होईल आणि हिरड्यांवरील सूजही कमी होईल. 

जखम लवकर भरेल

दात काढल्यानंतरही डॉक्टर मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला देतात. यामुळे जखम लवकर भरण्यास मदत मिळते. पण दात काढल्यानंतर 24 तासांनंतर गुळण्या कराव्या आणि जास्त जोरात करू नये.  

Advertisement

घशातील खवखव 

घशातील खवखव कमी करण्यासाठी तसेच श्वासोच्छवासाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळेल. घसादुखी, घशामध्ये जळजळ होणे किंवा अ‍ॅलर्जीपासून सुटका हवी असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. 

Advertisement

(नक्की वाचा: Constipation Remedies: पोट स्वच्छ करण्यासाठी सर्वात चांगलं चूर्ण कोणते? काय खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर?)

पाणी आणि मिठाचे प्रमाण किती असावे? 
  • ग्लासभर पाण्यात जवळपास एक किंवा अर्धा चमचा मीठ मिक्स करा.
  • मीठ पाण्यात विरघळू द्यावे. 
  • यानंतर पाण्याने गुळण्या कराव्या.  

(नक्की वाचा: Better Sleep Tips: गाढ झोप हवीय? झोपेचा 10-5-3-2-1 नियम फॉलो करा, 5 मिनिटांत मेंदू होईल शांत)

मिठाच्या पाण्याने रोज गुळण्या करू शकतो का?
  • तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हिरड्या नाजूक असतील तर वारंवार मिठाच्या पाण्याने गुळण्या करू नये, अन्यथा समस्या अधिक वाढतील. 
  • दिवसभरात केवळ एकदाच मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. 
  • तसेच हे पाणी चुकून पिऊ नये. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)