Constipation Remedies: बद्धकोष्ठतेची समस्या हल्ली प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये पाहायला मिळते. रात्री उशीरापर्यंत जागरण करणं, कमी पाणी पिणे, फायबरची कमतरता किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही पचनप्रक्रियेवर परिणाम होतात. ज्यामुळे पोट स्वच्छ होत नाही, काहींना बद्धकोष्ठतेच्या (Constipation Remedies) समस्येचा सामना करावा लागतो. याबाबत हेल्थ कोच उर्वशी अग्रवालने इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करत महत्त्वाची माहिती दिलीय. या व्हिडीओमध्ये त्यांनी एका खास चूर्णाची रेसिपी सांगितलीय.
चूर्ण तयार करण्यासाठी पाच सामग्री आवश्यक
- 100 ग्रॅम बडीशेप
- 100 ग्रॅम सोनामुखीची पाने
- 100 ग्रॅम छोटी हरड
- 100 ग्रॅम खडीसाखर
- 100 ग्रॅम मुलेठी
कसे तयार करावे चूर्ण?
- छोटी हरड भाजून घ्या आणि त्याची पावडर तयार करा.
- अन्य सामग्रींचीही पावडर तयार करा.
- सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करा.
- तयार आहे तुमचं चूर्ण
(नक्की वाचा: Boiled Amla Benefits: उकडलेला आवळा खाण्याचे 10 फायदे, शिजवलेला आवळा खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या सविस्तर)
चूर्ण कसे खावे?
- रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण कोमट पाण्यात मिक्स करून पिण्याचा सल्ला हेल्थ कोचनं दिलाय.
- सकाळी उठल्यानंतर पोट हलकं होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
(नक्की वाचा: Cucumber Side Effects: या 5 लोकांनी काकडी खाण्याची हिंमत करू नये, अन्यथा पत्करावा लागेल इतका मोठा धोका)
आरोग्यास कोणते फायदे मिळतील?हेल्थ कोचने सांगितलं की, बडीशेपमुळे पोटाला थंडावा मिळेल आणि पचनप्रक्रिया सुधारेल.
- गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
- सोनामुखीच्या पानांमुळे आतड्यांची गती सुधारेल आणि मलत्याग प्रक्रियेतील अडथळे दूर होतील.
- हरडमुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल आणि शरीराची चयापचयाची गती जलद होऊन पोट स्वच्छ होईल.
- खडीसाखरेमुळे पोटातील जळजळ शांत होईल.
- मुलेठी पचनप्रक्रियेसाठीही फायदेशीर आहे आणि यामुळे आतड्यांवरील सूजही कमी होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world