Green Tea Benefits: सलग 30 दिवस ग्रीन टी प्यायल्यास काय होतं? 1 दिवसात किती ग्रीन टी प्यावा?

Green Tea Benefits: ग्रीन टी प्यायल्यास शरीराला कोणते फायदे मिळतील? दिवसभरात किती कप ग्रीन टी प्यावा? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Green Tea Benefits: ग्रीन टी पिण्याचे फायदे"
Canva

Green Tea Benefits: ग्रीन टी हे आरोग्यासाठी सर्वात हेल्दी ड्रिंक मानले जाते. याद्वारे शरीराला कित्येक प्रकारच्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. पण जर तुम्ही रोज ग्रीन टी प्यायला सुरुवात केली तर शरीरावर कोणते परिणाम होतील? तसेच दिवसभरात किती प्रमाणात ग्रीन टी प्यावा? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

रोज ग्रीन टी प्यायल्यास काय होई? 

अँटी-ऑक्सिडंट्स 

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स असते, जे शरीराच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि शरीरातील जळजळही कमी करण्याचे काम करते. याव्यतिरिक्त फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचं संरक्षण करते. 

मेंदूसाठी लाभदायक 

ग्रीन टीमध्ये थोड्याशा प्रमाणात कॅफीन आणि L-theanine चे तत्त्व असतात. ज्यामुळे लक्ष केंद्रित होण्यास, मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास आणि मूड चांगला राहण्यास मदत मिळते. 

चयापचयाची गती जलद होईल

ग्रीन टीमुळे (Green Tea Benefits) शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळेल. रोज ग्रीन टी प्यायल्यास शरीरातील फॅट्स जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळेल. 

Advertisement

(नक्की वाचा: Banana Benefits: रोज केळ खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतील? 1 दिवसात किती केळी खावी? वजन वाढेल की घटेल?)

हृदयाचे आरोग्य 

काही संशोधनातील माहितीनुसार, ग्रीन टीमुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यासारख्या समस्याही कमी होण्यास मदत मिळेल. या समस्या कमी झाल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहील. 

Advertisement

(नक्की वाचा: Malasana Benefits: रोज मलासनाचा सराव केल्यास काय होतं? मलासनात किती वेळ बसावे? योगगुरूंनी दिली मोठी माहिती)

एका दिवसात किती ग्रीन टी प्यावा?

हेल्थलाइनच्या रिपोर्ट्सनुसार साधारणतः एका दिवसात एक किंवा दोन कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याहून जास्त ग्रीन टी पिऊ नये. पचनाशी संबंधित समस्या, अ‍ॅसिडिटी तसेच रिकाम्या पोटी आणि रात्री उशीरा ग्रीन टी पिणे टाळावे. दुपारच्या जेवणानंतर ग्रीन टी पिऊ शकता.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)